पुराच्या पाण्यात घरही गेले अन् पुस्तकही; ढसाढसा रडणाऱ्या मुलीच्या मदतीला सोनू सुद आला धावून!

बीजापूर | भारत देश सध्या कोरोना महामारीसारख्या संकटाचा सामना करत आहे. या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

देशातील जनता कोरोना महामारीबरोबरच नैसर्गिक संकटाचा देखील सामना करत आहे. सध्या बिहार, उत्तरप्रदेश, छत्तीसगड येथील नागरिक नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. या संकटामुळे हजारो लोकांची घरे उध्वस्त झाली आहेत.

राज्यातील बीजापूर जिल्ह्यातील छोट्या गावात राहणाऱ्या अंजली कुडियमच्या मदतीला सोनू सूद धावून आला आहे. गेल्या १५-१६ ऑगस्टला रात्री आलेल्या पाऊसामुळे अंजलीच्या गावात पूराचे पाणी आले होते.

गावकरी, नातेवाईक यांच्या मदतीने अंजली आणि कुटुंबीयांनी मध्यरात्री ३.३० च्या सुमारास गाव सोडून ५ किमी दूर एका गावामध्ये राहण्यासाठी गेले होते.

त्यामुळे या लोकांच्या मदतीसाठी प्रसिध्द अभिनेता सोनू सूद धावून आला आहे. यापूर्वीही अनेकवेळा सोनू सुदने जनतेची मदत केली आहे. यासंदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुसळधार पाऊसामुळे पुर आल्याने अंजली, तिचे वडील सोमल कुडियम, आजी, आत्या आणि भाऊ यांच्यासोबत सुरक्षितस्थळी पोहचली. परंतु ज्यावेळी पाणी कमी झाले तेव्हा ती पुन्हा गावातील तिच्या घराकडे परतली.

ज्यावेळी ती तिच्या गावी परतली त्यावेळी तिचे घर पूर्णपणे कोसळले होते. यावेळी अंजलीची नजर तिच्या पुस्तकांवर गेली तेव्हा तिचे अश्रू अनावर झाले. त्यानंतर ती ढसाढसा रडु लागली.

या घटनेचा व्हिडीओ एकाने ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लाखो लोकांनी हा व्हिडिओ पहिला तसेच सोनू सूदपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहचला.

त्यानंतर सोनू सूदने ताबडतोब हा व्हिडीओ शेअर करत ताई, तुझे अश्रू पुसून टाक, पुस्तकंही नवीन असतील आणि घरही नवीन बांधू असे सांगितले. असे म्हणत सोनू सूदच्या टीमने अंजलीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.