‘कोरोना युद्धात तुम्ही बिनीचे शिलेदार आहात; येणाऱ्या पिढ्या तुमचे योगदान विसरणार नाहीत’

मुंबई | भारतरत्न डॉ. बी.सी.रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ साजरा केला जातो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

कोरोना विषाणुच्या युद्धातील बिनीचे शिलेदार हे राज्यातील डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेला आणि समर्पणाला मी सलाम करतो. असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना उद्देशून पत्राद्वारे संदेश दिला आहे. कोविड युद्धातील डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे हे पत्र ई-मेल तसेच विविध माध्यमातून पाठविण्यात आले आहे.

पुढे त्यांनी असेही सांगितले की, ‘डॉक्टर्स दिन’ आपण दरवर्षी साजरा करतो. मात्र यंदा कोरोनाची ही परिस्थिती कसोटीची आहे.

कोरोना विषाणुच्या विरोधात आपण युद्ध पुकारले आहे. या युद्धाच्या आघाडीवर तुम्ही बिनीचे शिलेदार आहात. रुग्ण सेवेतून कोरोना विरोधात तुम्ही लढत आहात.

हे कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून तसेच प्रियजनांपासून कित्येक दिवस दूर राहावे लागते.
त्यामुळे कित्येकांसाठी तुम्ही देवदूत आहात.

तुमचे हे योगदान येणाऱ्या कित्येक पिढ्या विसरणार नाहीत. यातून आपण कोरोना विषाणुला हरवल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वासही मला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.