रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने चोरली तब्बल ६ कोटींची वीज; जाणून घ्या पुर्ण प्रकार

वसई | वसईमधून वीज चोरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसईमधील अमाफ ग्लास टफ या कंपनीने मागील ५० महिन्यात तब्बल ६ कोटी १७ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार भरारी पथकाच्या समोर आला आहे.

या प्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वीज वापर विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या निर्देशानुसार भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये ४ आरोपी पकडण्यात आले आहेत. यामध्ये अमाफ ग्लास टफ कंपनीचे भागीदार व वीज वापरकर्ते अब्दुल्ला आझाद हुजेफा व शब्बीर असिर हुजेफा तसेच जागेचे मालक प्रफुल्ल लोखंडे आणि वीजचोरी यंत्रणा बसवून देणारा अज्ञात इसम अशा ४ जणांचा यामध्ये समावेश आहे.

भरारी पथकाच्या तपासादरम्यान हाकिमुद्दीन कुतुबुद्दीन उनवाला या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्याची अधिक पाहणी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे रिमोट कंट्रोल आढळून आला या रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून कारखान्याच्या वीजवापरात ९० टक्के घट होत असल्याचे आढळून आले.

तर रिमोट कंट्रोलचे सर्किट एका पांढऱ्या रंगाच्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये निळ्या काळ्या आणि लाल टेपमध्ये लपवून ठेवले होते. भरारी पथकाच्या पाहणीदरम्यान त्यांच्या निदर्शनास आले. या ४ आरोपींवर ठाणे पोलिसात २००३ च्या विजकायद्यानुसार कलम १३५,१३८,१५० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुलै २०१७ पासून या कारखान्याने तब्बल ६ कोटी १७ लाख ७१ हजार ३३० रुपये किंमतीची ३३ लाख ६ हजार ४९५ युनिट वीज चोरी केल्याप्रकरणी भरारी पथकाचे अभियंता शशांक पानतावणे यांनी याविषयी तक्रार केली.

 

महत्वाच्या बातम्या
लाडक्या बाप्पासमोर केतकी माटेगावकरने गायले गाणे; ऐकून तुम्हीही भारावून जाल..
काय सांगता? मोदी सरकार घरबसल्या देणार ५०,००० रुपये, पण करावे लागेल ‘हे’ काम

अशा नराधामांना सार्वजनिकरित्या फाशी द्यायला पाहिजे: साकीनाका प्रकरणावरुन अमृता फडणवीस भडकल्या
गणपतीसाठी’मोदक’ बनवण्याची आगळीवेगळी पद्धत; अशाप्रकारे बनवा लाजवाब मोदक..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.