काय सांगता! मुली भाव देत नाहीत म्हणून पठ्ठ्याने थेट आमदाराला पत्र लिहीत केली तक्रार

आपल्या काही समस्या असतील किंवा विभागातील कामासंबंधी काही गोष्टी असतील तर त्यासाठी आपण लोकप्रतिनिधींना संपर्क करतो. मात्र चंद्रपूरमधील एका पठ्ठ्याने तेथील आमदाराला का पत्र लिहिले असावे हे वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही.

खरेतर माणूस प्रेम मिळवण्यासाठी कायपण करू शकतो. मात्र चंद्रपूर मधील एका तरुणाने प्रेम मिळवण्यासाठी अगदी वेडेपणाचा कळस गाठला आहे. भूषण राठोड असे पत्र लिहिणाऱ्या तरुणाचे नाव असून राजुरा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांना पत्र लिहिलं आहे.

तालुक्यात भरपूर मुली आहेत मात्र एकही मुलगी पटत नसल्याची तक्रार या तरुणाने आमदार सुभाष यांच्याकडे केली आहे. या तरूणाने हे पत्र लिहून थेट सोशल मीडियावरती वायरल केले असून हे पत्र वाचणाऱ्याच्या पोटात दुखल्याशिवाय राहणार नाही.

पत्रात असे म्हटले आहे की, “सविनय विनंती याप्रमाणे आहे की, संपूर्ण तालुक्यात भरभरुन मुली असून देखील मला एकही गर्लफ्रेंड नसणे चिंतेची बाब आहे. माझा आत्मविश्वास खचून गेला आहे. मी खेड्या गावातील असून राजुरा गडचांदूर येथे रोज फेरी मारत असतो. परंतु मला एकही मुलगी पटत नाही. दारु विकणाऱ्यांना, काऱ्या डोमऱ्यांना गर्लफ्रेंड असते हे बघून माझा जीव जळून राख होते. तरी माझी ही विनंती आहे की विधानसभा क्षेत्रातील युवतींना तुम्ही प्रोत्साहन दिले पाहिजे की आमच्या सारख्यांना सुद्धा भाव देण्यात यावा.”

दरम्यान पत्र लिहिणारा भूषण राठोड हा नेमका कोण असून तो कुठे राहतो आणि काय करतो याचा कोणालाच थांगपत्ता नाहीये. सदर पत्राबाबत आमदारांना विचारले असता असल्या कोणत्याच आशयाचे पत्र मिळाले नसून, अश्या प्रकारच्या विषयावर पत्रव्यवहार करणे उचित नसल्याचे आमदार यांनी स्पष्ट केले.

सदर पत्र हे केवळ एक मजेची गोष्ट म्हणून लोक पाहत असेल तरी अश्या प्रकारे गर्लफ्रेंड न मिळाल्याची तक्रार लोकप्रतिनिधींना करणे चुकीची गोष्ट असून असल्या प्रकारामुळे आणखी तरुण असेल काही करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वर वर पाहता हे प्रकरण जेवढे हास्यास्पद आहे तेवढेच चिंता वाढवणारे सुद्धा आहे.

 

महत्वाच्या बातम्या
…म्हणून जावयाने सासुचे गुप्तांग दगडाने ठेचले; मुंबईतील भयानक घटनेने महाराष्ट्र हादरला
पैसा जाताच पोटच्या पोरीचीही माया आटली! राणू मंडलला वाऱ्यावर सोडून पोरगी फरार
लंकेचा चोरीचा वाळूचा ट्रक पकडणाऱ्या तहसिलदार देवरेंची अखेर बदली; निलेश लंकेंसोबत झालता वाद
पती झोपेत असताना पत्नीने कात्रीने प्रायव्हेट पार्ट कापून अडकवला नटबोल्ट; ४० वर्षाचा तरुण विव्हळत राहिला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.