Devendra Fadanvis : एकीकडे नवीन सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने अनेक नेते नाराज आहेत. तर दुसरीकडे ज्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले आहे, ते मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा न करता स्वतःच परस्पर वेगवेगळ्या घोषणा करत आहेत. त्यामुळे या मंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच सुनावले आहे.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर विशेष निशाणा साधला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर एक वक्तव्य केले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली.
अब्दुल सत्तार यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेप्रमाणेच राज्यातही शेतकरी सन्मान योजना सुरु करण्याचा विचार सुरु आहे, असे वक्तव्य केले होते. उपमुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी सत्तारांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी कुठलीही चर्चा न करता तुम्ही कशी काय ही घोषणा केली?, असा प्रश्न त्यांनी सत्तारांना विचारला.
देवेंद्र फडणवीस यांनी थेट मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उचलून धरला. यावेळी त्यांनी सर्वच मंत्र्यांना सुनावले. यावर आपण ही योजना जाहीर झाली नाही तर त्याचा विचार सुरु आहे असे म्हणालो होतो. परंतु, माध्यमांनी याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती प्रसिद्ध केली, असे उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले.
मात्र, मंत्र्यांच्या या परस्पर घेतलेल्या निर्णयांमुळे फडणवीसांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच तुम्ही कोणत्याही योजनेबद्दल घोषणा करण्याच्या आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंत्र्यांना समज दिली.
यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा घोषणा करू नये असे आदेश मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिले. तसेच केवळ प्रसिद्धीसाठी कोणालाही न विचारता असे परस्पर निर्णय घेणे टाळा, असा सल्लाही त्यांनी मंत्र्यांना दिला. या सगळ्यामुळे मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली.
महत्वाच्या बातम्या
Navneet Rana : लव्ह जिहाद प्रकरण नवनीत राणांच्या अंगलट, थेट पोलिसांत गेली तक्रार, वाचा तक्रारीत काय म्हटलंय?
VIDEO : Amisha Patel : वयाच्या ४६ व्या वर्षीही अमिषा पटेलने ओलांडल्या सर्व मर्यादा, टू पिस घालून व्हिडीओ केला शेअर
Uttar Pradesh : मेहुणीसोबत मिळून दाजी बाईकवर बसून करायचा ‘असं’ काम, सीसीटीव्ही पाहून पोलिसही हैराण
डॉक्टरांकडून मृत घोषित, पत्नीने पतीच्या हाताला स्पर्श करताच हृदयाची धडधड सुरू; वाचा नेमकं काय घडलं?