रात्रीत मालामाल झाला शेतकरी! बॅंक खात्यात अचानक आले ५२ कोटी; जाणून घ्या पुर्ण प्रकरण

बिहारमध्ये बँक अकाऊंटमध्ये लाखो करोडो रुपये अचानक जमा होण्याच्या घटनांचा खेळ चालूच आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना मुज्जफरपुर जिल्ह्यातील कटरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथे एक वृद्ध शेतकरी राम बहादूर शाह यांच्या अकाऊंटमध्ये ५२ करोड रुपये जमा झाल्याची घटना समोर आली आहे.

हा वृद्ध शेतकरी बँक कर्मचाऱ्याकडे त्याच्या पेन्शनची रक्कम तपासण्यासाठी गेला होता. या शेतकऱ्याने अकाऊंटमधील रक्कम तपासण्यासाठी त्याचे आधार कार्ड बँक कर्मचाऱ्याला दिले. यानंतर जे समोर आलं यावर त्या बँक कर्मचाऱ्याचा देखील विश्वास बसत नव्हता.

कारण शेतकऱ्याच्या खात्यात तब्बल ५२ कोटींची रक्कम दाखवली गेली. ही घटना समोर आल्यानंतर हा प्रकार सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. अशा प्रकारची घटना पहिल्यांदा घडली नसून काही दिवसांआधीही अशाच प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत.

दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये तब्बल ९०० कोटींपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाल्याची घटना समोर आली होती तसेच त्याआधी खगडियामधील बख्तियारपूर ग्रामीण बँकेत रणजीत दास नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये ५.५ लाख रुपये जमा झाल्याची घटना घडली आहे.

राम बहादूर शाहच्या खात्यावर 52 कोटी रुपये येण्याची चर्चा जेव्हा प्रसारमाध्यमांमध्ये पसरली, तेव्हा त्याच्या मुलाने सुजित कुमारने सरकारकडे अपील केले आहे. ते म्हणाले, ” माझ्या वडिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 52 कोटींपेक्षा जास्त रक्कम आली आहे. बँक अकाऊंटमधील रक्कम पाहून आम्ही सर्वच आश्चर्यचकित झालो आहे. आम्ही शेती करतो. आम्ही सरकारकडे मागणी करतो की, सरकारने आम्हाला काही मदत करावी. कारण आमची परिस्थीती अत्यंत हालाखीची आहे.”

तसेच कटरा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी मनोज पांडे यांनी सांगितलं की, स्थानिक ग्रामस्थ आणि समाज माध्यमातून आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांकडून देखील तपास सुरू आहे.

 

महत्वाच्या बातम्या
TCS मधील लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून शेती करतेय ही तरुणी, आज वर्षाला कमावतेय तब्बल २० कोटी रुपये!
आजींचे वय ७५ पण जोश २५ चा! नागपुरच्या या आजींचे फाफडे आहेत जगप्रसिद्ध, जातात अमेरिकेपर्यंत
अजितदादा तब्बल १३ नगरसेवक फोडत भाजपला देणार मोठा धक्का; स्वत:च केले जाहीर
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी पुणे पुर्णपणे बंद, कठोर निर्बंध लावण्याचा अजितदादांचा आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.