सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी दिल बेचारा मधली अभिनेत्री चौकशीसाठी आई अन् वकीलासमवेत झाली हजर

मुंबई। अभिनेता सुशांतसिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा होता.

या चित्रपटातील त्याची सहकलाकार संजना संघी हिची पोलिसांनी चौकशी केली असून, तिचा जबाब नोंदविला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा हा होता.

या चित्रपटात त्याच्यासोबत संजना संघी ही होती. पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलावले होते. ती तिच्या आई आणि वकिलासोबत चौकशीसाठी हजर झाली होती. पोलिसांनी तिची चौकशी करुन जबाब नोंदविला आहे.

या प्रकरणी सुशांतसोबत काम केलेल्या इतर सहकलाकारांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येमागील सर्व कारणे पडताळली जात आहेत.

या प्रकरणी आत्तापर्यंत २८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तर काही नवीन माहिती समोर आल्याने सुशांतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात येणार आहे.

सुशांतचा अंतिम पोस्टमार्टेम रिपोर्ट नुकताच मिळाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे या रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.