Share

शिंदे ऍक्शन मोडमध्ये, आदित्य ठाकरेंना धक्का देत मुंबई महापालिकेतील खास अधिकाऱ्यांची केली बदली

मुख्यमंत्रीपदाचा कारभार स्विकारताच एकनाथ शिंदेंनी कामाचा सपाटाच लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीने घेतलेले काही निर्णय बदलले आहेत. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे(Aditya Thkare) यांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली आहे.(In Shinde Action Mode, Aditya Thackeray was replaced by a special officer of Mumbai Municipal Corporation)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबई महानगर पालिकेतील तीन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांचा देखील समावेश आहे. कोविड काळात धारावीमधील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ‘धारावी मॉडेल’ राबविण्यात आले होते.

यामध्ये मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी मोलाची भूमिका बजावली होती. आता किरण दिघावकर यांची बदली करण्यात आली आहे. किरण दिघावकर यांची बदली भायखळा या ठिकाणी करण्यात आली आहे. किरण दिघावकर सांभाळत असलेला कार्यभार आता प्रशांत सपकाळे सांभाळणार आहेत.

मुंबई महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी उत्तर (जी/ एन) वार्डमध्ये उत्तम काम केले आहे. सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. पण आता सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांची बदली भायखळा येथे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंधन दरवाढीबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. NDRF जवानांना तसेच इतर आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सध्या राज्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर मेहेरबानी; अपात्रतेसाठीच्या यादीतून आदित्य ठाकरेंना वगळलं
मी शरद पवारांना नव्हे, पण ‘या’ दोन नेत्यांना घाबरतो; शहाजी बापूंनी केला खुलासा, वाचा काय म्हणाले?
अजितदादा विरोधी पक्षनेते होताच फडणवीसांनी केले मोठे विधान, राष्ट्रवादीच्या पोटात आला गोळा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now