Rajasthan : गेल्या काही दिवसात चोरी व लुटमारीच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत. अशीच एक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. या घटनेत लग्न झाल्यानंतर नवरीनेच तिच्या घरी चोरी करून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगढ तालुक्यातील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रतनगढ येथील रहिवासी नवरतन सांखला हा चुरु येथे ७ ऑगस्टला त्याच्या नातेवाईकाकडे गेला असता त्याला तिथे काळू नावाचा व्यक्ती भेटला. काळूने त्याला लग्न जमवून देण्याचे आश्वासन देत दोन लाख रुपयांची मागणी केली.
नवरतने पोलिसांना सांगितले की, १५ ऑगस्टला दुपारी काळू रतनगड येथील माझ्या घरी आला व तो म्हणाला की, मी एका गरीब कुटुंबाला ओळखतो, ज्याला एक सुंदर मुलगी आहे. कुटुंब गरीब आहे, त्यामुळे तुम्हीच लग्नाचा खर्च करा. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने मी त्याला दोन लाख रुपये दिले.
पुढे त्याने सांगितले की, १७ ऑगस्टच्या रात्री काळू त्याचा साथीदार मुकेशसोबत कारमधून माझ्या घरी आला. तिथून तो मला आणि माझ्या नातेवाईकांना अलीगड येथे घेऊन गेला. १८ ऑगस्टला सकाळी तो आम्हाला सर्वांना एका घरी घेऊन गेला
त्यानंतर काळूने मला त्या मुलीची ओळख करून दिली. प्रियंका चौहान (वय २८) असे त्या मुलीचे नाव होते. त्या मुलीने लग्नासाठी होकार दिल्यानंतर कोर्टात आमचे लग्न लावून देण्यात आले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर १९ ऑगस्टला पहाटे ४ वाजता तो प्रियंकाला त्याच्या घरी घेऊन गेला.
पुढे त्याने सांगितले की, सहा दिवसांनी म्हणजेच २४ ऑगस्टच्या रात्री आम्ही जेवण करून झोपलो होतो. त्यानंतर रात्री तीन ते चार वाजताच्या दरम्यान नववधू प्रियंका चौहान ही तिच्या साथीदारांना सोबत घेऊन खोलीतील सोने व चांदीचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रक्कम घेऊन पळून गेली. त्यानंतर पतीने वधूसह दोन दलालांच्या विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या अहवालाच्या आधारे वधूसह दोन दलालांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
महत्वाच्या बातम्या
Supriya sule : शिंदेंच्या मदतीला जाणे शीतल म्हात्रेंना पडणार महागात; राष्ट्रवादीने दाखवला चांगलाच हिसका
eknath khadse : दिल्लीत अमित शहांना भेटून येताच एकनाथ खडसेंनी फोडली डरकाळी; म्हणाले यापुढे मी…
Shinde group : ‘मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल’; शिंदे गटातील मंत्र्याची दर्पोक्ती
raj thackeray : पुण्यात पाकीस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर राज ठाकरे भडकले; मोदींकडे केली ‘ही’ मागणी