Share

Sanjay Raut on Devendra Fadnavis: कामाख्या मंदिरात 65 रेडे कापून सरकार सत्तेत आले तो प्रसाद म्हणून सुद्धा खाल्ला, अशा सरकारचे जनक फडणवीस सांगतात शाकाहारी व्हा, असली थोतांड बंद करा; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले

Sanjay Raut on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात 15 ऑगस्टला काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये मांसाहारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर वादाला तोंड फुटलं आहे. या निर्णयावर शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (13 ऑगस्ट) जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत, “असली थोतांडबाजी बंद करा” असा सल्ला दिला.

“शरद पवारांच्या आदेशांची आठवण काढणं म्हणजे विनोद”

राऊत म्हणाले की, “शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्री राहून किती काळ झाला? त्या काळात अशा प्रकारची मागणी कोणी केली होती का? केव्हाचे आदेश बाहेर काढून निर्णयाचं समर्थन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनोहर जोशी (Manohar Joshi) आणि तत्पूर्वी पवार मुख्यमंत्री होते, पण अशा पद्धतीने बंदी घालणे आश्चर्यकारक ठरेल.” त्यांनी स्पष्ट केलं की 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नसून विजयोत्सव आहे. मात्र, भाजपकडून प्रत्येक प्रसंग धार्मिक रंगात रंगवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “तुम्हाला हवं तर पुरणपोळी पार्ट्या घ्या, पण हे नाटक बंद करा,” असा टोला त्यांनी लगावला.

“रेडे कापून सत्तेत आले आणि प्रसाद म्हणूनही खाल्ले”

राऊतांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, “हे सरकार कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) मंदिरात रेडे आणि बकरे कापून सत्तेत आलं, आणि त्या रेड्यांचा प्रसाद म्हणूनही खाल्ला गेला. तिथे 65 रेडे कापण्याची परंपरा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद म्हणून सेवन करावा लागतो. इतर प्राणीही कापले जातात. अशा पद्धतीने सत्तेत आलेल्या सरकारचे जनक फडणवीस जर आता ‘शाकाहारी व्हा’ म्हणत असतील, तर हा उघड थोतांडपणा आहे.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now