पारशी समाजात मृतदेह गिधाडांना खायला देतात; कारण समजल्यावर आश्चर्यचकीत व्हाल

मृत्यू हा प्रत्येकाला एक दिवशी येणारच आहे. जेव्हा माणूस मारतो तेव्हा त्याच्या शरीराला काहीच महत्व उरत नाही. एकदा आत्म्याने शरीर सोडले की शरीर मोकळे होते. जिवंतपणी प्रत्येक माणूस आपल्या शरीराला जपत असतो पण जेव्हा माणूस मारतो तेव्हा त्याच्या शरीराचे हे आकर्षणसुद्धा नाहीसे होते.

मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत प्रत्येक धर्मात वेगळी आहे. जसे की, हिंदू आणि शीख धर्मात देहाला जाळले जाते. तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात देहाला पुरले जाते. परंतु पारशी धर्मात ही पद्धत जरा वेगळी आहे. तीच पद्धत आज आपण जाणून घेणार आहोत.

पारशी धर्म हा खूप जुना धर्म आहे. या धर्मात तीन हजार वर्षांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही पाळल्या जातात. पारशी धर्मात अंत्यसंस्काराच्या विधीला दोखमेनाशिनी असे म्हणतात. पारसी धर्मात जेव्हा एखादा व्यक्ती मारतो तेव्हा त्याच्या शरीराला एकांतात नेले जाते.

एकांतात नेल्यावर तिथे ते त्या शरीराला गिधाडांच्या हवाली करतात. म्हणजे गिधाडे त्या शरीराला खातात. भारतातील बहुतांश पारशी लोक हे मुंबईत राहतात. तिथे टॉवर ऑफ सायलेन्स आहे जिथे ते आपल्या नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करतात.

या ठिकाणी मृत शरीराला आणून ठेवले जाते मग गिधाडे त्या शरीराला येऊन खातात. त्यांच्यामते असे केल्यावर त्यांना मुक्ती मिळते. पण आता ही स्मशानभूमी काही कारणास्तव बंद करण्यात आली आहे. पूर्वी ही स्मशानभूमी अतिशय शांत भागात असायची.

पण जसेजसे शहरीकरण होत गेले त्यामुळे शांतता राहिली नाही. तसेच गिधाड व इतर पक्षी अर्धवट मृतदेह खात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती. त्यामुळे जवळपास राहणाऱ्या रहिवासी लोकांनी याला विरोध केला. आणि आता गिधाडेही जास्त राहिलेली नाहीत.

पारशी लोकांच्या अंत्यविधील खूप अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण गिधाड हा पक्षी आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. आजच्या घडीला गिधाडांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. २००७ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार १०० पेक्षा कमी गिधाडे राहिलेले आहेत अशी नोंद केली गेली होती.

पारसी समाजाला अंत्यसंस्कारासाठी दुसरा पर्याय शोधावा लागतो आहे. आता सध्याच्या घडीला पारसी लोकांना आपल्या मृत नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सुरतला जावे लागते. गिधाड नामशेष झाल्याने त्यांना गुजरातमध्ये जावे लागत आहे. त्यांना त्यासाठी ४०० किलोमीटरचा पल्ला गाठावा लागत आहे.

जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शहराच्या व्यावसायिक क्षेत्रात पुढे असणाऱ्या पारसी धर्मियांना मुंबईत हक्काची स्मशानभूमी आहे. पण तिथे अंत्यसंस्कार करता येत नाहीत हे दुर्दैव आहे. काही लोक तर स्पष्टपणे सांगतात, आता पारसी लोकांची ही प्रथा बंद होण्याच्या मार्गावर आहे.

पण पारसी सिद्धांतवाद्यांचं असं म्हणणं आहे की, याशिवाय दुसरी कोणतीही प्रथा आम्ही स्वीकारू शकत नाही. प्रथा बदलण्याबाबत अनेक पारसी लोकांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांना दुसऱ्या कोणत्यातरी ठिकाणी किंवा सुरतला अंत्यसंस्कार करण्यासाठी जावे लागते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.