Share

एका रात्रीत ट्रक ड्रायव्हर झाला करोडपती, मिळाले 7.1 कोटी; म्हणाला, मला मोबाईलवर मेसेज आला अन्..

अमेरिकेतील एका ट्रक ड्रायव्हरचं नशीब पालटलं आहे. मिशिगनमधील एका ट्रक ड्रायव्हरने(Truck Driver) स्क्रॅच-ऑफ लॉटरीचे तिकीट विकत घेतले होते. त्याने लॉटरीचे ते तिकीट स्क्रॅच केले. त्यावेळी त्या व्यक्तीला लॉटरी लागली. सुरवातीला त्या व्यक्तीला आपल्याला १.५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे वाटले. पण नंतर लॉटरीचे तिकीट तपासली असता त्या व्यक्तीला ७.९ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.(In one night the truck driver became a millionaire, got 7.1 crores; Said, I got a message on my mobile and…)

यामुळे मिशिगनमधील तो ट्रक ड्रायव्हर एका दिवसात करोडपती झाला आहे. लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीने सांगितले की, “मी एक ट्रक ड्रायव्हर आहे. मी सध्या मिशिगनमध्ये राहत आहे. मी गेल्या काही दिवसांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत होतो. मला लॉटरी लागायला हवी, असे मला नेहमी वाटायचे. पण मला लॉटरी लागत नव्हती.”

“एके दिवशी मी स्क्रॅच-ऑफ लॉटरीचे तिकीट विकत घेतले. त्यानंतर मी ते लॉटरीचे तिकीट स्क्रॅच केले. त्यावेळी मला मोबाइलवर एक संदेश आला. मला सुरवातीला वाटले की, मी १.५ लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. पण नंतर मी लॉटरीचे तिकीट व्यवस्थित पहिले. त्यावेळी त्यावर ७.९ कोटी रुपयांचा उल्लेख होता”, असे लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीने सांगितले.

लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीने पुढे सांगितले की, “त्यानंतर माझ्या मोबाइलवर पुन्हा एक संदेश आला. त्यामध्ये तुम्ही ७.९ कोटी रुपये जिंकल्याचे सांगितले होते. या गोष्टीवर माझा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे मी पुन्हा लॉटरी विकत घेतलेल्या दुकानात गेलो आणि त्या दुकानदाराला याबद्दल विचारणा केली. त्यावर त्या दुकानदाराने तुम्हाला ७.९ कोटी रुपयांचे लॉटरी लागल्याचे सांगतो.”

“मी मिशिगनमध्ये ट्रक चालवायचो. मी खूप कष्ट करायचो. पण आता मला ७.९ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे मी आता श्रीमंत झालो आहे. मी या पैशांमधून एक नवीन गाडी विकत घेणार आहे आणि उरलेले पैसे मी बचत करणार आहे”, असे लॉटरी जिंकलेल्या व्यक्तीने सांगितले आहे. या घटनेची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
महाराष्ट्राताली अमरावतीत उदयपुरसारखे भयावह हत्याकांड? शहांनी थेट NIA ला चौकशीसाठी पाठवले
एकनाथ शिंदेंना जबर धक्का? ‘त्या’ व्हायरल पत्रामुळे संभ्रम वाढला; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा
खान त्रिकुटावर आलीये कॅमिओ रोल करण्याची वेळ, ‘या’ चित्रपटांमध्ये दिसणार शाहरूख, सलमान, आमिर

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now