“बचपन का प्यार” गाणे म्हणत १३ महाभाग बसले एका दुचाकीवर, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी धरले धारेवर

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय शक्कल लढवतील हे कोणीच नाही सांगू शकत. मात्र फेमस होण्याचा हा अनेकांना सोप्पा मार्ग वाटतो आणि मग अनेक जण असे काही करून बसतात ज्यामुळे त्यांना आयुष्यभराची अद्दल घडते.

काही वेळेस जीव देखील धोक्यात टाकून अनेक करणामे करणारे व्यक्ती सुद्धा आपण सोशल मिडियावर पाहिले आहेत. असाच एक महाभाग तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान वायरल होत आहे.

यात ही व्यक्ती एक नाही, दोन नाही, तीन नाही तर तब्बल १२ मुलांना आपल्या दुचाकीवर बसवते, आणि दुचाकी केवळ जागेवर उभी आहे असे देखील नाही, तर दुचाकीवर बसून बचपन का प्यार मेरा भुल नाही जाना रे गाण्याचे सुर आवळत फेर फटका मारताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दोन लहान मुलांना गाडीच्या पुढच्या असणाऱ्या मडगार्डवर बसवलं आहे. तर पाच मुलांना पेट्रोलच्या टाकीवर बसवलं आहे. तर चार मुलं मागच्या बाजूला बसलेली आहेत. एका मुलाला या महाभागाने तर चक्क आपल्या खांद्यावर बसवून गाडी चालवली आहे.

अश्या प्रकारे सुरक्षेला वाऱ्यावर सोडून एवढ्या सगळ्या मुलांचा जीव धोक्यात घालून दुचाकी चालविणे गुन्हा आहे, मात्र सोशल मीडियावर वायरल होण्यासाठी सगळ्या गोष्टींचा विसर व्हिडिओ मधील व्यक्तीला पडलेला दिसत आहे. अनेक जणांनी व्हिडिओ पाहून त्यास मजेचा एक भाग म्हणून पसंती दिली आहे तर अनेक युजर्सने व्हिडिओवर टीकास्त्र डागले आहे.

एका युजरने लिहिले आहे की, व्हिडिओच्या नादात त्या लहान मुलांचा जीव धोक्यात टाकताना लाज नाही वाटत? तर दुसरा युजर बोलतो आहे की याला यमराजाची भीती नाही राहिली. इंस्टाग्राम वरील giedde या अकाउंटवरून हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून अकाउंट मालकाने काही झालं तर या सगळ्याची जबाबदारी कोणाची अशी कॉमेंट व्हिडिओ पोस्ट करताना टाकली आहे.

 

महत्वाच्या बातम्या
काय सांगता! मुली भाव देत नाहीत म्हणून पठ्ठ्याने थेट आमदाराला पत्र लिहीत केली तक्रार
…म्हणून जावयाने सासुचे गुप्तांग दगडाने ठेचले; मुंबईतील भयानक घटनेने महाराष्ट्र हादरला
सगळं बाजूला ठेवा आणि आधी गाडीची नंबरप्लेट बदला; नाहीतर होईल जबर दंड; जाणून घ्या नवा नियम
‘या’ वृत्तपत्राच्या एका चुकीमुळे राजकारणात माजला हाहाकार; असे होऊ लागले आरोप-प्रत्यारोप…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.