…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली तरी चालेल – कुणाल कामरा

सुशांतसिंह प्रकरणावरून अभिनेत्री कंगना रणौतसह काही व्यक्तींनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. राष्ट्रपती राजवटीच्या मुद्यावर कुणाल कामराने ट्विट केले आहे. ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टमध्ये संजय राऊत यांची मुलाखत झाल्यापासून कामरा त्यांच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे.

“ज्या दिवशी संजय राऊत राष्ट्रपती असतील, त्या दिवशी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली, तरी मला चालेल” असे कुणाल कामराने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी त्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. यावेळी त्याने संजय राऊत यांना एक जेसीबीची प्रतिकृती भेट स्वरूपात दिली होती.

आजपर्यंत कुणालच्या या शोमध्ये अनेक मोठे राजकीय नेते सहभागी झाले आहेत. पण संजय राऊत सरांनी पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरू करेन, असे ट्विट कुणाल कामराने केले होते.

‘शटअप या कुणाल’ शोसाठी कुणालने गेल्या रविवारी संजय राऊत यांच्यासोबत मुलाखतीचे चित्रिकरण केले. लवकरच कुणाल कामरा आणि संजय राऊत यांची मुलाखत ‘शट अप या कुणाल’ या पॉडकास्टच्या माध्यमातून प्रदर्शित होणार आहे. कुणाल कामराने संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोच्या दुसऱ्या सिझनचे पहिले पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

जुनी १० रूपयांची नोट द्या आणि २५ हजार रूपये घेऊन जा

..म्हणून सनी देओलने ‘डर’ चित्रपटाच्या सेटवर सामान उचलून फेकले होते

वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी टिव्हीवर काॅमेडी शो करणारी गंगुबाई आता काय करतीय पहा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.