कर्जबाजारी रिक्षाचालकाचे नशीब फळफळले! रात्रीत झाला तब्बल १२ कोटींचा मालक; जाणून घ्या…

कोची येथील एका रिक्षा चालकाने 12 कोटी रुपयांची ओणम बंपर केरळ लॉटरी जिंकली आहे. कर आणि एजन्सीचे कमिशन कापल्यानंतर, त्यांना जवळपास सात कोटीहून अधिक रक्कम मिळणार आहे. 58 वर्षीय जयपालन हे कोच्चितील मरडू येथील पूप्पनपरंबिल हाऊसचे रहिवासी आहेत.

जयपालन हे एक रिक्षा चालक आहेत. मराडू येथील आंबेडकर जंक्शन ऑटो स्टँडवर ते रिक्षा चालक म्हणून आहेत. कोट्टाराम भगवती मंदिराजवळच ते राहतात. त्यांच्या कुटुंबात त्यांची 95 वर्षीय आई लक्ष्मीबाई, पत्नी मणी, दोन मुल वैशाख आणि विष्णू आहेत.

पत्नी मणी ही होमिओपेथिक हॉस्पिटलमध्ये साफसफाईचे काम करत आहे तर, वैशाख इलेक्ट्रिशियन आणि विष्णू एक होमिओपेथिक डॉक्टर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मरडू येथे राहणाऱ्या जयपालनने 12 कोटींची लॉटरी जिंकली आहे. त्यांनी ही फॅन्सी लॉटरी खरेदी केली होती.

या लॉटरीचे निकाल ओणम सणाच्या दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आले. लॉटरी जिंकल्यानंतर जयपालनने सांगितले आहे की, गेल्या 10 सप्टेंबरला त्रिपुनीतुरा येथून मीनाक्षी लकी सेंटर या एजन्सीकडून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते.

या तिकीटाची किंमत 300 रुपये आहे. याधीही त्यांनी 50,000 रुपयांची लॉटरी जिंकली होती. बक्षिसांच्या रकमेचे काय करायचे असे विचारले असता, जयपालन यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले, “माझ्यावर काही कर्ज आहे जे मला फेडायचे आहे. माझ्याकडे न्यायालयात दोन चालू दिवाणी खटले देखील आहेत जे मी सोडवू इच्छितो.

मला माझ्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे आहे आणि माझ्या बहिणींना आर्थिक मदत करायची आहे”. तर याबद्दल त्यांची आई म्हणाली, “आम्ही कर्जामध्ये बुडलो होतो. ही लॉटरी लागली नसती तर माझा मुलगा त्यांना पैसे देऊ शकला नसता. मला वाटते की देवाने माझे अश्रू पाहिले आणि आम्हाला मदत केली. ”

 

महत्वाच्या बातम्या
तृप्ती देसाईंचा बिग बॉसच्या घरात गौप्यस्फोट; म्हणाल्या आमच्या आंदोलनामुळेच इंदुरीकर महाराजांच्या…
संघ संकटात असतानाही जेमिसन मात्र तरुणीसोबत स्मितहास्य करण्यात व्यस्त, तंबूतील तरुणीचा फोटो व्हायरल..
करुणा शर्मा यांना जामीन मंजूर, जेलमधून बाहेर येताच धनंजय मुंडेंबद्दल भूमिका बदलली? म्हणाल्या..
सायरस मिस्त्रींना कंपनीच विकायला लागली, रतन टाटांशी घेतलेला पंगा पडला महागात  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.