काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजप नेत्यासह वडील व भावाला गोळ्या घालून केले ठार

काश्मीरमध्ये अतिरेक्यांचे हल्ले खूप वाढले असून बुधवारी भाजपच्या नेत्याला अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले आहे.

उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांचे वडील आणि भाऊ यांना अज्ञात अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी भाजपाचे बंदीपोरा येथील जिल्हाध्यक्ष शेख वसीम बारी त्यांचे वडील बशीर अहमद बारी आणि भाऊ उमर बारी यांना संदिग्ध अतिरेक्यांनी गोळ्या घालून ठार केले.

त्यांच्या बंदीपोरा येथील निवासस्थानाबाहेर बुधवारी सायंकाळी त्यांना ठार मारण्यात आले. त्यांच्या सेक्युरिटी गार्डला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेनंतर पोलिस आणि सैन्य त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी कसून कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, मागील महिन्यात दक्षिण अनंतनाग जिल्ह्यातील लार्कीपोरा भागातील सरपंच आणि कॉंग्रेस पक्षाचे सदस्य असलेल्या अजय पंडिता यांना त्यांच्या मूळ गावात अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.