Share

Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल

Hemant Soren

Jharkhand : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार, शनिवारी राज्यपाल रमेश बैस यांनी हेमंत सोरेन यांची आमदारकी अपात्र ठरवण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

याच पार्श्ववभूमीवर सकाळी हेमंत सोरेन यांनी राज्यातील सत्ताधारी आघाडीतील आमदारांची बैठक बोलवली होती. यावेळी बैठकीसाठी आलेले आमदार व मंत्री त्यांच्यासोबत मोठमोठ्या बॅग व इतर साहित्य घेऊन आले होते. या आमदारांना छत्तीसगडमध्ये पाठवण्याची शक्यता आहे. सर्व आमदारांना तीन बसेसमध्ये भरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून नेण्यात येत आहे.

या आमदारांसोबत खुद्द मुख्यमंत्री हेमंत सोरेन सुद्धा छत्तीसगडला जाण्याची शक्यता आहे. त्यांनी बसमध्ये बसलेल्या आमदारांसोबत आपला एक फोटो शेयर केला आहे. या ३६ आमदारांमध्ये फक्त झारखंड मुक्ती मोर्चाचेच आमदार आहेत असे नाही, तर यामध्ये काँग्रेस पक्षाचेदेखील आमदार छत्तीसगडला रवाना होत आहेत.

झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा या दोन पक्षाची आघाडी आहे. सध्या झारखंडमध्ये याच आघाडीची सत्ता आहे. पण मुख्यामंत्री हेमंत सोरेन यांचे नाव खाण घोटाळ्यात आल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास काद्यानुसार त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

हेमंत सोरेन यांना राजीनामा देऊन पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेता येऊ शकते. अथवा त्यांच्या जागी त्यांच्याच पक्षातल्या दुसऱ्या नेत्याला मुख्यमंत्रीपद मिळू शकते. हेमंत सोरेनच्या राजीनाम्या नंतरही त्यांच्याच पक्षाचे सरकार झारखंडमध्ये राहणार आहे. कारण बहुमताचा आकडा अजूनही झारखंड मुक्ती मोर्चकडेच आहे.

तसेच या आमदारांना छत्तीसगडमधील लतरातु डॅमच्या गेस्टहाऊसमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेस्ट हाऊसमध्ये खुर्च्या आणि गादया मागवण्यात आल्या आहे. तसेच या गेस्टहाऊसमध्ये आमदारांच्या जेवणाची विशेष व्यवस्थाही केली आहे.

यासोबतच हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द झाली तरीही मुख्यमंत्रीपद सोरेन कुटुंबाकडेच राहणार असल्याचेही बोलले जात आहे. हेमंत सोरेन त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्रीपदाचा खुर्चीवर बसवणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे

महत्वाच्या बातम्या
Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
Marathi actress : पहिल्यांदा ताजमध्ये गेली अन् चहाची किंमत ऐकून हादरली; मराठी अभिनेत्रीने स्वतःच सांगीतला किस्सा
Bilquis Bano case : बिल्कीस प्रकरणातील आरोपींचे कारागृहातून सुटल्यानंतरचे वर्तन अत्यंत घृणास्पद; न्यायमुर्ती भडकले
दारू पिऊन महिलेचा बसमध्ये धिंगाणा; पोलिसांनाही आवरेना, व्हिडीओ व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now