पित्याने जुळ्या पोरांसह मृत्यूला कवटाळले, पत्नीनेही दीड महिन्यापूर्वीच गळ्याला फास आवळले..

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील महाजन कुटुंबियांपैकी तीन जणांचा मृतदेह सय्यदपिंप्री शिवारात खदान परिसरात तरंगताना दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील रहिवाशी असलेले शंकर गुलाब महाजन त्यांच्या पत्नी आणि दोन जुळी मुले पृथ्वी आणि प्रगती यांच्यासोबत नाशिकच्या जळ उके शिवारात वास्तव्यास होते.

तेथील एका कंपनीमध्ये काम करून महाजन कुटुंब स्वतःचा उदरनिर्वाह चालवीत असे. मात्र अचानक कोरोनाचे संकट आले आणि लॉकडाऊनमुळे शंकर महाजन यांना नोकरीला मुकावे लागले. तेव्हापासून मिळेल त्या ठिकाणी काम करून शंकर आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरत होते.

मात्र अचानक शंकर आणि त्यांच्या मुलांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या सांगण्यानुसार मयत व्यक्ती हे मूळचे यावल(जळगाव) येथील रहिवासी असून ते ओझर (नाशिक) येथे वास्तव्यास होते.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून शंकर यांच्या पत्नीने अवघ्या दीड महिन्यापूर्वी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पत्नीच्या निधनानंतर शंकर यांच्यावर मानसिक तणाव असून ते नैराश्याच्या गर्तेत अडकले होते.

मृत पत्नीच्या आईकडे मुलांना ठेऊन शंकर भेटेल ते काम करत होते मात्र अचानक ६ तारखेला शंकर कोणालाही न सांगता आपल्या दोन्ही मुलांना घेऊन निघून गेले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. शिवाराच्या आसपास दुचाकी, चप्पल आणि आधारकार्ड सापडले त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटण्यास मदत झाली.

पोलिस यासंबंधी पुढील तपास करत असून आत्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. हा घातपात होता की आत्महत्या , शंकर यांना हे टोकाचे पाऊल उचलण्यास कोणी भाग पडले का? याबद्दल पोलिस अधिक तपास करीत आहे.

 

महत्वाच्या बातम्या
अनिल अंबानींना आले चांगले दिवस; दिल्ली मेट्रोविरोधात असलेली केस जिंकली, आता मिळणार ४६ अब्ज रुपये
टाटाच्या ‘या’ शेअरने घातला बाजारात धुमाकूळ, १ लाखाचे झाले ४७ लाख रूपये; कसे ते जाणून घ्या..
सुंदर पिचाई यांना आपल्या पत्नीला भेटायला उशीर झाला आणि गुगल मॅप्सची स्थापना झाली, वाचा किस्सा
‘या’ झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख; झाडाभोवती असतो २४ तास कडक पहारा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.