Uddhav Thackeray : शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच ठाकरे गटातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे अजूनही शिवनेतील गळती सुरूच आहे. पक्ष बांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आटोकाट प्रयत्न करत आहेत.
मात्र, जळगावमध्ये शिवसैनिकांमध्ये वाद पेटलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे हा वाद निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या नव्या कार्यकारिणीला शिवसैनिकांनी असहमती दर्शविली आहे.
जळगाव जिल्ह्याची नवी कार्यकारिणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जाहीर करण्यात आली आहे. परंतु, यावरून तिथल्या शिवसैनिकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव जिल्ह्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
यावर भुसावळ येथील जुने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांनी थेट वरणगाव येथील जिल्हाप्रमुखांचे घर गाठले. तब्बल दोन तास जिल्हाप्रमुखांच्या घरासमोर बसून शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुखांचा तीव्र निषेध केला आहे.
यावेळी शिवसैनिकांनी अनेक घोषणाबाजी केली. तसेच जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन लोकांना संधी देण्यात येत आहे, हे मान्य नसल्याने त्यांनी आंदोलन केले आहे. त्यामुळे ही कार्यकारिणी रद्द करून नवीन जाहीर करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याशिवाय, भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक हे संघटनेच्या वरिष्ठांना वेठीस धरण्याचे काम करत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांचे कृत्य हे निषेधार्य आहे, असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी व्यक्त केले आहे. एकीकडे शिवसेनेला लागलेली गळती व दुसरीकडे शिवसैनिकांचे हे आंदोलन यामुळे शिवसेना अजून अडचणीत सापडेल का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
आणखी एका राज्यातील विरोधी पक्षाचे सरकार पाडण्याची भाजपची खेळी; ४० आमदार रिसाॅर्टवर दाखल
गद्दार संतोष बांगर आणि हेमंत पाटलांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खेळला मोठा डाव
महाविकास आघाडीचं काय होणार? खुद्द शरद पवारांनी सांगितली अंतर्गत बाब, ‘असा’ आहे प्लॅन, शिंदे सरकारच्या पोटात गोळा
Shubhman Gill: सारा तेंडूलकरला नव्हे तर ‘या’ बाॅलीवूड अभिनेत्रीला डेट करतोय शुभमन गिल; फोटो आले समोर