‘इंडियन आयडल १२’ चे परीक्षक नेहा कक्कर व हिमेश झाले ट्रोल; लोकं म्हणाली ड्रामा करणं बंद करा..

‘इंडिअन आयडल १२’ हा छोट्या पडद्यावरील रियालिटी शो जेवढा लोकप्रिय आहे तेवढाच वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पाहायला मिळतो. गेल्या अनेक दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे हा शो चर्चेत असतो. या शोचे चाहतेदेखील प्रचंड प्रमाणात आहेत. तसेच अनेक नेटकरी या शोबद्दल ट्रोल करताना पाहायला मिळतात.

 

काही दिवसांपूर्वी अमित कुमार यांनी असा दावा केला होता की शोच्या निर्मात्यांनी त्यांना स्पर्धकांचे कौतुक करायला सांगितले होते. तसेच पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने निर्मात्यांना गुणांपेक्षा गरिबी दाखवण्यात जास्त इंट्रेस्ट आहे, असे म्हटले होते. बऱ्याच नेटकऱ्यांनी हे पाहिल्यानंतर शोवर टीका करण्यास सुरुवात केली.

सध्या ‘इंडियन आयडल १२’ या रियालिटी शोवर सोशल मीडियावर अनेक मीम्स हे व्हायरल होताना दिसत आहेत. या वेळी शोचे परीक्षक नेहा कक्कड,  विशाल दादलानी, हिमेश रेशमीया यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. तिन्ही जजला घेऊन अनेक वेगवेगळे मिम्स तयार करण्यात आले आहे.

जेव्हा स्पर्धक त्याच्या गरीबी विषयी किंवा त्याच्या दु:खा बद्दल बोलतात तेव्हा हे परीक्षक लगेच रडू लागतात असे  म्हणतं अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. शोचे जज नेहा कक्कड आणि हिमेश रेशमीया हे दोघे ही कोणाची काही कथा ऐकली की भावूक होतात आणि रडू लागतात. त्यांच्या या भावूक होण्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहे.

याविषयी बोलताना एक नेटकरी म्हणाला की ‘जेव्हा एखादा स्पर्धक त्याच्या कुटुंबा विषयी काही सांगायला सुरुवात करतो आणि समजा परीक्षक रडले नाहीत. तर प्रेक्षकांना आश्चर्य वाटते की यांना यावेळी रडू आलं नाही. तर दुसरा नेटकरी म्हणाला की, परीक्षक आणि स्पर्धकाला रडताना पाहून प्रेक्षक म्हणतात काय मस्त अभिनय करतात.

तसेच आणखी एक नेटकरी म्हणाला की प्रत्येकवेळी ड्रामा करणं बंद करा. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी परीक्षकांना ट्रोल केलं आहे. ज्याप्रमाणे ह्या शोबद्दल ट्रोलिंग चालू आहे त्याचप्रमाणे या शोचे चाहतेही प्रचंड आहेत.

हे ही वाचा-

विराट कोहलीचा भर मैदानातील भांगडा डान्स सोशल मीडियावर व्हायरल, एकदा व्हिडिओ पहाच

बाबा का ढाबा: कांता प्रसाद यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन केला आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर

VIDEO: सिंगलपणा दुर करण्यासाठी पठ्ठ्याने शोधला भन्नाट पर्याय; व्हिडिओ पाहून लोकांनाही बसला धक्का

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.