पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने आता गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. डिसेंबरमध्ये गुजरात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे(Punjab) मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गुजरात दौरा केला होता.(in gujrat state aap candidate will win exit poll)
यादरम्यान आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणामधून महत्वाची माहिती समोर आली आहे. गुजरात राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाचे ५८ उमेदवार निवडून येतील, अशी माहिती या सर्वेक्षणामध्ये देण्यात आली आहे. एका एजन्सीच्या माध्यमातून आम आदमी पक्षाने हे सर्वेक्षण केलं आहे.
या सर्वेक्षणासंदर्भातील माहिती आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रभारी संदीप पाठक यांनी दिली आहे. गुजरात राज्याच्या ग्रामीण भागातील मतदार काँग्रेस पक्षाला सोडून आम आदमी पक्षाला पाठिंबा देतील. तसेच शहरी भागातील मध्यमवर्गीय मतदार देखील आम आदमी पक्षाला मतदान करतील, अशी माहिती संदीप पाठक यांनी दिली आहे.
सर्वेक्षणासंदर्भात माहिती देताना आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रभारी संदीप पाठक म्हणाले की, “गुजरात राज्यातील ग्रामीण मतदार आमच्या पक्षाला मतदान करेल. तसेच शहरातील गरीब आणि मध्यमवर्गीय मतदार देखील आम्हाला पाठिंबा देतील”, असे संदीप पाठक म्हणाले आहेत. नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे.
आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रभारी संदीप पाठक पुढे म्हणाले की, “ग्रामीण भागातील मतदार काँग्रेसला मतदान करणार नाही. तो मतदार आम आदमी पक्षाकडे वळेल. येत्या काळात आम आदमी पक्षाकडे येणाऱ्या मतदारांची संख्या वाढलेली असेल”, अशी आशा संदीप पाठक यांनी व्यक्त केली आहे. पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षासाठी संदीप पाठक यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
संदीप पाठक यांना आम आदमी पक्षाकडून पंजाबमधून राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. भाजपने देखील गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला ५५ जागा मिळतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
..म्हणून भारतात मोटारसायकल जास्त विकल्या जातात, महिंद्रांनी दिलेले उदाहरण पाहून खळखळून हसाल
‘या’ कारणांमुळे श्रीलंकेसारखीच भारतातील अनेक राज्ये होणार कंगाल, यादी वाचून तुम्हालाही बसेल धक्का
वक्फ बोर्डाच्या जमिनींवर चालवणार बुलडोझर, मदरशांबाबतही केले मोठे वक्तव्य, योगींच्या मंत्र्याची मोठी घोषणा