साडी घातली म्हणून महिलेला हाॅटेलबाहेर काढले; दिल्लीतील संतापजनक प्रकार

साडी ही भारतीय संस्कृती म्हणून ओळखला जाणारा एक पेहराव असून प्राचीन काळापासून महिला साड्या परिधान करत आल्या आहेत. भारतीय संस्कृतीची ओळख असणाऱ्या साडीला जर भारतातच कोणी आक्षेप घेत असेल तर…अशीच एक संतापजनक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यात एका महिलेला सांगितले जात आहे की, ती या रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून प्रवेश करू शकत नाही. हा व्हिडिओ 16 सेकंदांचा असून या व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष रेस्टॉरंट कर्मचारी असल्याचे दिसत आहेत.

व्हिडिओ काढणारी व्यक्ती रेस्टॉरंट कर्मचाऱ्याला विचारत आहे की, “साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही असं कुठे लिहिल आहे, मला दाखवा” यावर रेस्टॉरंट कर्मचारी उत्तर देताना दिसत आहे की,” मॅडम, आम्ही तुम्हाला स्मार्ट कॅज्युअल्सची परवानगी देत ​​आहोत पण साडी हा स्मार्ट कॅज्यूअल (कपड्यांमधील) प्रकार नाही,” असं सांगून निघून जाते.

हा व्हायरल व्हिडिओ “अ‍ॅक्वीला रेस्टॉरंट मधला असून साडी नेसलेल्यांना प्रवेश नाही कारण साडी हा स्मार्ट कॅज्यूअलचा प्रकार नाही. स्मार्ट कपडे म्हणजे काय? याची व्याख्या असेल तर मला सांगा. मला स्मार्ट कपडे काय असतं ते सांगा म्हणजे मी साडी नेसणं बंद करेन,” अशा कॅप्शनसहीत साडी घातलेल्या महिलेने व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांनी‌ संताप व्यक्त केला आहे.

भाजपा कार्यकर्ते शेफाली वैद्य यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या की, “साडी स्मार्ट वेअर आहे की नाही कोण ठरवणार?, मी अमेरिका, युएई आणि युकेमधील अनेक उत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेलेय. तिथे मला कोणीही अडवलं नाही. आणि इकडे अ‍ॅक्वीला नावाच्या एक रेस्टॉरंटमध्ये ड्रेस कोड ठरवताना साडी ही स्मार्ट ड्रेसकोड नसल्याचं म्हटलं जातय. विचित्र आहे हे सगळं,” अशा कॅप्शनसहीत वैद्य यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

मागच्या वर्षी मार्च 2020 मध्येही दिल्लीतील एका रेस्टॉरंटमध्ये असा प्रकार घडला होता, साडी नेसल्यामुळे वसंत कुंजच्या “Kylin and Ivy” रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला प्रवेश देण्यात आला नव्हता. गुरुग्राममधील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता नाग आपल्या पतीसोबत रेस्टॉरंटमध्ये गेल्या होत्या. मग तेथील कर्मचारी म्हणाले, ‘जे येथे पारंपरिक कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जात नाही. हे आमच्या पॉलिसीमध्ये नाही’. 10 मार्च 2020 रोजी समोर आलेल्या या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. तेव्हाही लोकांनी रेस्टॉरंट्सच्या भेदभावपूर्ण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

 

महत्वाच्या बातम्या
बिग बॉसच्या घरात कीर्तनकार शिवलीला ढसाढसा रडली; समोर आले हैराण करणारे कारण
ज्या गुरूने विद्या शिकवली त्याच गुरूला कायमचे संपवले; वाचा अट्टल गुन्हेगारालाही लाजवनारी आनंद गिरीची भयानक कृष्णकृत्ये…
दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजप युती ? केंद्रीय मंत्र्याने सांगितला तडजोडीचा फाॅर्म्युला
मुलीच्या हातावरचे टॅटू पाहून घरमालक घाबरला आणि तिला घरातून काढले बाहेर, वाचा संपुर्ण प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.