Share

Bengaluru : आधी विद्यार्थिनीच्या बापासोबत ठेवले शारीरीक संबंध, नंतर…; शिक्षिकेचा प्रताप ऐकून पोलिसही हादरले

Bengaluru : बंगळुरूमध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला प्रेमसंबंध ठेवून, नंतर व्हिडिओ आणि फोटोच्या आधारे ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळण्याचा हा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. या प्रकरणी शिक्षिकेसह आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

शिक्षिकेचा कट आणि ब्लॅकमेलचा प्रकार उघड

बंगळुरूच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने या प्रकरणात २५ वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी, गणेश काळे (३८) आणि सागर (२८) यांना अटक केली आहे. या तिघांनी मिळून तक्रारदाराकडून चार लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.

कशी झाली ओळख आणि कसा फसवणुकीचा कट रचला?

तक्रारदार पश्चिम बंगळुरूमध्ये आपल्या पत्नी आणि तीन मुलींंसह राहत होता. तो व्यवसायिक असून, त्याची सर्वात लहान मुलगी पाच वर्षांची आहे. २०२३ मध्ये तिचा शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले असता, शिक्षिका श्रीदेवी रुदागीशी त्याची ओळख झाली.

प्रवेश प्रक्रियेदरम्यान ओळख वाढली. श्रीदेवीने सतत फोन कॉल, मेसेज आणि व्हिडीओ कॉल करून तक्रारदाराशी जवळीक निर्माण केली. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळल्यानंतर त्यांचे शारीरिक संबंधही झाले.

ब्लॅकमेलची सुरूवात – १५ लाखांची मागणी

संबंधानंतर काही काळाने श्रीदेवीने तक्रारदाराकडे १५ लाख रुपये मागितले. मात्र, तो पैसे द्यायला तयार नव्हता. त्यानंतर, ५० हजार रुपये उसने घेण्याच्या बहाण्याने ती त्याच्या घरी पोहोचली.

याच दरम्यान, व्यवसाय अडचणीत आल्याने तक्रारदाराने पत्नी आणि मुलींना गुजरातला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला मुलीच्या शाळेचा दाखला घेण्यासाठी पुन्हा शाळेत जावे लागले.

ब्लॅकमेलिंग आणि खंडणीसाठी धमक्या

मार्च महिन्याच्या सुरूवातीला तक्रारदार शाळेत गेला असता, श्रीदेवी रुदागीच्या कार्यालयात आधीच गणेश काळे आणि सागर उपस्थित होते. त्यांनी तक्रारदाराचे श्रीदेवीसोबतचे खासगी फोटो आणि व्हिडीओ दाखवले आणि त्याबदल्यात २० लाख रुपये मागितले.

धमकी देत ते म्हणाले, “जर पैसे दिले नाहीत, तर हे व्हिडीओ आणि फोटो तुझ्या कुटुंबासमोर उघड करू.”

त्यानंतर तक्रारदाराने काही रक्कम दिली, मात्र मागणी वाढत गेली. १७ मार्च रोजी श्रीदेवीने फोन करून ५ लाख माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी, काळे आणि सागरसाठी प्रत्येकी १ लाख, आणि उर्वरित ८ लाख रुपये पाठवण्याची मागणी केली.

शेवटी पोलिसांकडे धाव – तीन जण अटकेत

या धमक्यांमुळे वैतागलेल्या तक्रारदाराने थेट पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचत शिक्षिका श्रीदेवी, गणेश काळे आणि सागर यांना अटक केली.

तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या प्रकाराने बंगळुरूमध्ये मोठी खळबळ उडाली असून, शिक्षण क्षेत्राची बदनामी होण्यासह अशा घटनांमुळे लोक अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now