भल्याभल्यांना नडणाऱ्या कंगणाबाबत ‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’ने केली ‘ही’ गोष्ट; पाहून तुम्हीही थक्क व्हाल

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाने २०१५ साली बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील तिसऱ्या आणि बॉलीवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. या चित्रपटाने तब्बल ९६९ कोटींची कमाई केली होती.

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर यांनी मुख्य भूमिकेत काम केले होते. तसेच यामध्ये आणखी एक बालकलाकार  होती, जिच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष्य वेधले होते. ती अभिनेत्री म्हणजे चित्रपटातील ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षाली मल्होत्रा होय.

या हिट चित्रपटाने हर्षालीला एका रात्रीत स्टार बनवले होते. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी प्रचंड पसंती दाखवली होती. या चित्रपटामुळे हर्षालीची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.

हर्षाली सोशल मिडीयावर चांगलीच सखूप क्रीय असते. ती तिचे फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असते. चित्रपटातील ‘मुन्नी’ मध्ये आणि सध्याच्या काळातील तिच्या फोटोमध्ये बरीच तफावत पाहायला मिळते. अश्यातच तिने तिचा एक हटके व्हिडिओ इंस्टाग्राम अकाऊटवर शेअर केला आहे.

हर्षालीने शेअर केलेल्या व्हीडोओमध्ये ती अभिनेत्री कंगना रनौतची नक्कल करताना दिसत आहे. तिने व्हिडिओमध्ये कंगनाच्या डायलॉगवर लिपसिंग केले आहे. कंगनाचा हा डायलॉग सध्या खूप चर्चेत आहे.

हर्षालीच्या  व्हिडिओला प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही चाहत्यांनी हा सर्वोकृष्ट व्हिडिओ म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने हर्षालीच्या या व्हिडिओला कमेंट म्हणून म्हटले की, ‘सेम हर्षाली मलाही हीच सवय आहे’.

हर्षालीच्या या व्हिडिओला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या व्हिडिओला आता पर्यंत २ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. तसेच ४० हजारपेक्षा जास्त लाईक मिळाले आहे. यापूर्वीही हर्षालीने अनेक व्हिडिओ पोस्ट केले होते.

हे ही वाचा-

VIDEO; तेरे ही सपने अंधेरों में उजालों में पाकिस्तानी तरुणीवर चाहते पुन्हा घायाळ

बाबो! रश्मिकाचा फॅन ९०० किलोमीटर प्रवास करुन आला तिला भेटायला, पण तिथं जाऊन भलतंच घडलं

जंगलातून जात होता दुचाकीवर समोर आली तीन अस्वल, पुढे काय झाले पाहा व्हिडिओ

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.