Share

Mercedes : गाडी आहे की बुलडोझर? मर्सिडीजच्या अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे; व्हिडीओ पाहून हैराण व्हाल

Mercedes Accident

Mercedes : सध्या सर्वत्र रस्ते अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशातच आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळ बेन्झ मर्सिडीज कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे. सायरस मिस्त्रींच्या मृत्यूनंतर मर्सिडीज कारच्या अपघाताची ही दुसरी घटना आहे.

आंध्र प्रदेशातील हैद्राबादमध्ये चंद्रगिरी बायपास रोडवर हा अपघात घडला आहे. बेन्झ कार आणि एका ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली आहे. या अपघतात कारचा पुढचा भाग पूर्ण फुटलेला आहे. मात्र, सुदैवाने या कारमधील सर्व लोक सुरक्षित आहेत. तसेच या कारमुळे ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे अपघातात निधन झाले. विशेष म्हणजे त्यांची कारदेखील मर्सिडीजच होती. मर्सिडीज बेन्झ जीएलएस लक्झरी एसयूव्ही ही २०१७ मध्ये भारतात पहिल्यांदा लॉन्च झाली होती. मात्र, आता या कारच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आता सलग दुसऱ्यांदा त्याच मॉडेलच्या कारचा अपघात झाला आहे. तसेच या अपघातात कारची अवस्था अतिशय खराब झाली आहे. त्यामुळे या कारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

सायरस मिस्त्री यांच्याकडे असलेल्या कारचे मॉडेल हे सात एअरबॅग्सने सुसज्ज आहे. मागे बसलेल्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी या एअरबॅग्स बसवण्यात आल्या आहेत. त्यांच्या अपघातानंतर समोरच्या दोन एअरबॅग पूर्णपणे उघड्या असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते.

अपघाताच्यावेळी सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती हे कारमध्ये मागच्या सीटवर बसले होते. यावेळी त्यांनी सीटबेल्ट लावलेला नव्हता. दरम्यान, त्यांच्या कारचा भयंकर अपघात होऊन यात त्यांचा मृत्यू झाला.

महत्वाच्या बातम्या
Palghar: सायरस मिस्त्रींच्या अपघातावेळी नेमकं काय घडलं? मर्सिडीज कंपनीच्या रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा
VIDIO : मर्सिडीजमधून आलेली एक व्यक्ती थेट रेशन दुकानात गेली; पुढे झालं असं काही की पाहून तुमची झोप उडेल
याला गरीब म्हणावं का? ‘तो’ दोन रुपये किलोने गहू घेण्यासाठी मर्सिडीजने आला; रेशन दुकानातून 4 पोती धान्य घेतलं, आणि..
कार्तिकी गायकवाडच्या २२ वर्षीय भावाचे वडीलांना स्पेशल गिफ्ट; नवीकोरी मर्सिडीज केली गिफ्ट

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now