जिवंतपणीच आमदाराच्या मृत्यूची बातमी व्हायरल; संतप्त आमदार म्हणाले..

बिहारमध्ये एका आमदाराच्या मृत्यूची बातमीची अफवा पसरली आणि राजकारणात एकच खळबळ उडाली. बघता बघता लोकांनी श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. हे प्रकरण इतकं पसरलं की, आमदाराला स्वतः सोशल मीडियावर जाऊन सांगाव लागलं की, “मी अजून जिवंत आहे”.

बिहारच्या बोचहांच्या मतदारसंघातून जिंकल्यानंतर विधानसभेत पोहोचलेल्या मुसाफिर पासवानच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. मुसाफिर पासवान हे मुकेश साहनी यांचा पक्ष विकसशील इन्सान पार्टी (व्हीआयपी) पक्षाचे आमदार आहेत.

रविवारी १९ सप्टेंबरच्या रात्री अचानक त्यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. ही बातमी पसरल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना शोक संवेदनाचे फोन येऊ लागले. काही लोकांनी थेट वैयक्तिक फोनवर कॉल करण्यास सुरुवात केली यांनंतर पासवान यांना धक्काच बसला.

बराच वेळ हा गोंधळ राहिल्यानंतर आणि ही बातमी व्हायरल झाल्यावर, शेवटी दिलासा देणारी बातमी सांगण्यात आली की, आमदार जिवंत आणि बरे आहेत. मृत्युबाबत खोट्या अफवा पसरवू नये असं देखील त्यांनी सांगितलं.

त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली यामध्ये त्यांनी सांगितल की, “बोचहां आमदार माननीय श्री मुसाफिर पासवान जी यांच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्या पूर्णपणे खोट्या आहेत, अशा अफवांनी गोंधळून जाऊ नका, आदरणीय आमदार, त्यांच्या कुटुंबासह निरोगी आणि स्वस्थ आहेत आणि नजीरपूर येथे, शेखपूर मुजफ्फरपूर निवासस्थानी सुखरूप आहेत.

सोशल मीडियावर अशा तथ्यहीन आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा जे पसरवत आहेत, त्यांनी सत्य जाणून घ्यावे आणि नंतर कोणतीही माहिती पसरवावी”, असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी पासवान यांच्यावर पाटणा येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. यावेळी मुकेश सहनी आणि चिराग पासवान यांनीही त्यांना भेट दिली होती. यानंतर बरे होऊन ते आपल्या घरी मुजफ्फरपूर येथे आले होते.

 

महत्वाच्या बातम्या

आर्या आंबेकरचा मोठा खुलासा, प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चेवर सोडले मौन..
मोठी बातमी: अश्लील चित्रपट प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर..
पवनदीपने अरुणिताला नेलं हिल्स स्टेशनवर, हिल्स स्टेशनवर जाऊन दोघांनी केलं ‘हे’ काम, पहा व्हिडिओ
चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपमध्ये येण्याची आॅफर; मुश्रीफांचा सणसणाटी गौप्यस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.