अरब राष्ट्रांप्रमाणेच बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी देता येईल का? – इम्तियाज जलील

मुंबईतील साकीनाका प्रकरणाबाबत संपूर्ण मुंबई हादरली असून सर्वच ठिकाणाहून या गोष्टीचा निषेध केला जात आहे. या प्रकरणात खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हस्तक्षेप केला असून पीडित कुटुंबाला लवकर न्याय मिळावा यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावे फास्टट्रॅक कोर्ट काय असतो ते अशा नराधमांना दाखवून द्यावे जेणे करून पुढे कोणी अशी हिंमत करणार नाही असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साकीनाका बलात्कार या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ट्विटवर केल्यानंतर या ट्विटला एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे.

इम्तियाज जलील यांनी साकीनाका बलात्कार प्रकरणी ट्विट केले आहे की, ‘साकीनाका येथील घटना दुर्दैवी, चीड आणणारी विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी आहे. मला माहिती आहे की, आपल्या देशात कायदेशीररित्या या गोष्टीला परवानगी नाही.

पण बलात्कारासारख्या घटना रोखून नराधमांवर वचक बसवायचा असेल तर कायद्यात सुधारणा नाही होऊ शकत का? ‘अरब राष्ट्रांप्रमाणे अशा गुन्हेगारांना भर चौकात थेट फाशी देण्याची तरतूद कायद्यात करायला हवी’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

‘कायद्याला घाबरत नाही अशा व्यक्तींसाठी हे एक मजबूत प्रतिबंध पाऊल ठरेल’ अशा प्रकारची खळबळजनक मागणी त्यांनी सरकारला केला आहे. अशीच मागणी सर्वसामान्यांची असून समाज माध्यमांवरून दिसून आले आहे.

 

महत्वाच्या बातम्या कंगना रनौतने ‘कपिल शर्मा शो’मध्ये सांगितल्या तिच्या लग्न करण्यासाठीच्या अटी; वाचून हैराण व्हाल
दहशतवाद्याच्या गोळीने घेतला रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीसाचा बळी; भयानक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
अबब! तब्बल २४ वर्षांनंतर लिफ्टचे दरवाजे उघडले, आत काय आहे पाहून सर्वांचेच धाबे दणाणले…
साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.