भाजपला सत्तेपासून दुर ठेवण्यासाठी कोणासोबतही युती करण्याची तयारी- इम्तियाज जलील

औरंगाबाद | अमरावती महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत कट्टर हिंदुत्वावादी पक्ष अशी ओळख असेलेल्या शिवसेनेची युती एमआयएमसोबत झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मात्र आता याबाबत एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत बोलताना खासदार इम्तियाज जलील म्हणाले, “देशातून भाजपला हद्दपार करायचं असून, देशाचं होत असलेलं नुकसान वाचवायचं आहे. यासाठी आम्हाला कोणासोबत युती करण्याची वेळ आली तरी चालेल आम्ही करू”.

तसेच जलील म्हणाले, अमरावतीच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांना शिवसेनेची मदत घेणं योग्य वाटलं असेल जेणेकरून विकासकामं करता येतील. हा निर्णय केवळ त्या अनुषंगाने झाला असल्याचं स्पष्टीकरण जलील यांनी दिलं आहे.

एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी फक्त भाजपावर निशाणा साधल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी कोणतीही आघाडी होत असेल तर एमआयएम त्याचे स्वागत करेल असं त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, औरंगाबादेत तो आमचा गड आहे. त्यामुळे तिथे आम्ही स्वतंत्र निवडणुक लढणार असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. मात्र अमरावती निवडणुकीनंतर भाजपकडून शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
चक्क शिवसेना आणि एमआयएम यांची युती, उंदीर-मांजराच्या मैत्रीची राजकीय वर्तुळात चर्चा
बाळासाहेब ठाकरेंच्या ४०० कोटींच्या स्मारकाऐवजी रूग्णालय उभारा – इम्तियाज जलील
कोरोनाचे नियम धाब्यावर! मनसे नेत्याने डान्सबारचा व्हिडीओ आणला समोर
‘नियम मोडला तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.