सुशांतने लैंगीक शोषण केल्याच्या आरोपाबाबत ‘त्या’ अभिनेत्रीचा महत्वपूर्ण खुलासा

 

मुंबई। अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मुंबई पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान ‘दिल बेचारा’ या चित्रपटातील त्याची सहकलाकार संजना संघी हिची पोलिसांनी काल चौकशी केली. त्यावेळी तिने माझ्या नावाने फेक अकाउंट बनून मी सुशांतवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप व्हायरल करण्यात आले होते. असे पोलिसांना सांगितले आहे.

“मी सुशांतवर #MeToo अंतर्गत कोणतेही आरोप केले नव्हते. सुशांतवर हे आरोप केले त्यावेळी मी अमेरिकेत होते. माझ्या नावाने फेक अकाउंट बनून मी सुशांतवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप व्हायरल करण्यात आले होते.

जेव्हा याबद्दल मला समजलं तेव्हा मी आमच्या दोघांची व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियावर शेअरही केले होती सुशांत माझ्याशी कधीही चुकीचं वागला नव्हता”, असे संजनाने पोलिसांसमोर स्पष्ट केले आहे.

त्याचबरोबर मी सुशांतवर कधीही गैरवर्तनाचे आरोप केले नाहीत, असेही तिने सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतवर गैरवर्तनाचे आरोप केल्यामुळे त्याला डिप्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.

आपली प्रतिमा खराब करण्याचा कोण तरी प्रयत्न करतंय अशी सतत भीती असायची. या अनुषंगाने संजनाची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २७ जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.