मराठा आरक्षणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी; संपूर्ण राज्याचे लक्ष

मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर आपली बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीची वरिष्ठ विधिज्ञांसमवेत बैठक झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यांसंबंधी चर्चा करण्यात आली होती.

आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची याचिका आहे. मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावे अशी मागणी केली आहे.

सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जाणार की नाही याचे उत्तर आज मिळेल अशी शक्यता आहे.

वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमात विरोधी याचिकांबाबत स्पष्टता मिळेल अशी शक्यता आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले.

सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. १ डिसेंबर २०१८ पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झाले.

तत्कालीन फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.