मुंबई | नोटाबंदीनंतर सुरु झालेले व आजपर्यंत मोफत असलेले युपीआय ट्रान्झेक्शनसाठी आता तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. कारण UPI पेमेंटवर १ जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे. जर कोणी थर्ड पार्टी अॅपद्वारे युपीआय ट्रान्झेक्शन करणार असेल तर त्यासाठी शुल्क मोजावे लागणार आहे.
थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सवर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसपीसीआयच्या या निर्णयामुळे आता UPI ट्रांझॅक्शनमध्ये आता कुठल्याही पेंमेंट अॅपची एकाधिकारशाही राहणार नाही.
हा अतिरिक्त चार्ज लावण्याचा निर्णय नेशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआई) घेतला आहे. NPCI ने याचबरोबर थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सकडून चालवण्यात येणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसमध्ये १ जानेवारी २०२१ पासून ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम लागू झाल्यानंतर गुगल पे, अॅमेझॉन पे, फोन पे सारख्या थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सच्या ग्राहकांवर परिणाम होणार आहे.
पेटीएमच्या ग्राहकांवर या नियमाचा परिणाम होणार नाही. युपीआय पैसे ट्रान्सफर करताना लावला जाणारा हा चार्ज पेटीएमला लागणार नाही.