‘पुणेकरांना घरगुती गणेशोत्सवाबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे महत्वाचे आवाहन’

 

पुणे | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यात पुण्यातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. तसेच कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरही बंदी घातली गेली आहे.

गणेशोत्सव जवळ आला असून पुण्यात दरवर्षी पाच लाख मूर्तींचे विसर्जन हौदात होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही संख्या लक्षात घेता पुणे महापालिकेने विसर्जन घाट आणि हौदाची व्यवस्था न करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीच करण्यात यावे, असे आवाहन पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केले आहे.

तसेच घरगुती विसर्जनासाठी सोडियम बाय कार्बोनेट संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सार्वजनिक घाट आणि विसर्जन हौदाची सुविधा यावर्षी महापालिकेकडून केली जाणार नाही, असेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, गणेशमूर्ती खरेदी करताना मंडळांनी आणि नागरिकांनी मूर्ती शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच खरेदी करावी. यावर्षी गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथावर परवानग्या दिल्या जाणार नाहीत, असेही यावेळी महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.