लक्ष्मीपुजनाला केरसुणीची पुजा का करतात? जाणून घ्या कारण

आज दिवाळीचा दुसरा दिवस आज लक्ष्मी पुजन. दिवाळीमधील सगळ्यात मोठा दिवस. यादिवशी लक्ष्मी कुबेर देवतांचे पुजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते.

दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा असे म्हणत हा मांगल्यपूर्ण सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. खर तर दिवाळीचा सण मोठा, नाही धन- संपत्तीला तोटा, असे म्हणटले तर वावगं ठरेल. कारण दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.

आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. कारण आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र फिरते. आणि आपल्या निवासासाठी जागा शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रीयता असेल तिथे ती आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी,सदाचारी,क्षमाशील माणसे राहतात तेथे वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

आज लक्ष्मीची यथासांग पूजा करुन, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून लक्ष्मीपूजन साजरे केले जाते.

या दिवशी भगवान विष्णूंनी राजा बळीला पाताळ लोकाचे स्वामी बनविले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित असल्याचे समजून दिवाळी सण साजरा केला होता. तसेच याच दिवशी भगवान विष्णूंनी नरसिंह रूप घेऊन हिरण्यकश्यपाचे वध केले होते. याच दिवशी समुद्रमंथनाच्या नंतर देवी लक्ष्मी आणि धन्वंतरी प्रकटले होते. याच दिवशी देवी काली देखील प्रकटल्या होत्या म्हणून बंगाल मध्ये दिवाळीच्या दिवशी देवी कालिकेची पूजा केली जाते.

आणि याच दिवशी भगवान राम १४ वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येला परतले होते. अशी आख्यायिका आहे की भगवान राम रावणाचा वध करून २१ दिवसानंतर अयोध्येला परतले म्हणून त्यांचा विजयोत्सवाच्या निमित्ताने घरो-घरी दिवे लावतात.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीला महत्त्व आहे. लक्ष्मीपूजनाबरोबरच स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असणारी नवी केरसुणी विकत घेऊन तिला लक्ष्मी मानून तिची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

तसेच रात्री कुबेरपूजन करण्याची रित होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पुजावे. खरंतरं चांगल्या मार्गाने मिळवलेल्या आणि चांगल्या मार्गाने खर्च होणाऱ्या पैशालाच ‘लक्ष्मी ‘ म्हणतात.

‘सोमय्या, आपली औकात पाहून बोला; ठाकरेंच्या पायाशी बसून तुम्ही खासदार झालात’

अन्वय नाईक – ठाकरे कुटुंबात व्यवहार झाले असतील तर…; सेनेच्या वाघाने दिले खुले आव्हान 

‘अमोल कोल्हे नुसता अभिनय करू नका, इतिहास वाचून समजून घ्या, खलनायक ओळखा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.