धनत्रयोदशीला कडूनिंबाचा कडू नैवेद्य का दाखवतात? जाणून घ्या यामागील शास्रीय कारण

दिवाळी म्हणटलं की दिवे, रांगोळी, फराळ, यासगळ्याची रेलचेल असते. पाच दिवसाची दिवाळी आनंद देऊन जाते. याच पाच दिवसातील पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

अश्विन कृष्ण त्रयोदशीस म्हणजेच आजच्या दिवशी धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. यादिवशी देवांचे वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाल्याची मान्यता आहे. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवीचीही पूजा करतात.

खरंतरं आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो. तसेच व्यापारी आणि शेतकरी वर्गात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थांचे वाटप केले जाते.

या दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते. तसेच नोकरी, व्यवसाय यानिमीत्त परगावी असलेली कुटूंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवळी साजरी करतात.

धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी किंवा सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा चालत आली आहे. असे म्हणतात की, भांड्यांची खरेदी करून परिवारातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य चांगले राहते आणि त्याच्यावरील संकट दूर होते.

आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादाला कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात.

आता यामागचे कारण असे आहे की, कडुलिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारी देवता आहे. कडुलिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होत नाही. कडुलिंबाचे महत्त्व खुप आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

‘हे’ गुन्हेगार अर्णव गोस्वामी यांना का पाठीशी घालत आहेत? नाईक यांच्या कुटुंबीयांचा सवाल 

नितीशकुमार मुख्यमंत्रीपद सोडणार ? केले मोठे विधान

एकेकाळी मोडक्या बॅटने प्रॅक्टीस करायचा, आज आहे जगातला सर्वोत्तम फलंदाज; हिटमॅनची स्टोरी..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.