भारतीय हवामान विभागाने(IMD) बुधवारी देशातील हवामानसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. उत्तर-पश्चिम भारत आणि पूर्व-ईशान्य भारतात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) काही भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(imd gives warning rain alert this place in india)
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारीपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेशात हलका, मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या प्रदेशात बर्फवृष्टी देखील होऊ शकते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ३ आणि ४ फेब्रुवारीला गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय ३ फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशात(Himachal Pradesh) मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होऊ शकते.
उत्तराखंड राज्यातही ३ आणि ४ फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ३ आणि ४ फेब्रुवारीला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमधील तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमान शून्याच्या खाली गेले आहे. पुढील तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. जम्मू आणि काश्मीर राज्याची राजधानी श्रीनगरमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
श्रीनगरमध्ये मंगळवारी तापमान उणे १.८ अंश सेल्सिअस होते. पण बुधवारी किमान तापमानात घट होऊन उणे १.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पूर्व उत्तर प्रदेशात देखील कडाक्याची थंडी पडणार आहे. बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये आज हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
गेल्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांमधील बहुतांश भागात किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी आणि मुसळधार पावसाचे अस्मानी संकट देशावर कोसळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तास महत्वाचे असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
अर्थसंकल्पाचा राकेश झुनझुनवालांनी घेतला पुरेपूर फायदा, काही तासांत कमावले ३४२ कोटी रुपये
जेव्हा रात्रीच्या ३ वाजता कपिल अचानक पोहोचला होता शाहरूखच्या घरी, अशी होती शाहरूखची रिऍक्शन
”गल्ली ते दिल्ली पळाला, अखेर ‘बोक्या’ शरण आला, आता दोन दिवस बस पोलीस कोठडीत”