करोनावरील औषधाबाबतचा पतंजलीचा दावा खोटा; IMA ने आरोग्यमंत्र्यांकडे मागितले स्पष्टीकरण

मुंबई : काही दिवसांपूर्वीच योगगुरु बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला होता. तसेच पतंजलीने करोना विरोधात ‘कोरोनिल’ प्रभावी असून, याला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचा दावा केला. मात्र योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने बनवलेल्या ‘कोरोनिल’ औषधावर वाद निर्माण झाला आहे.

करोना संसर्गावरील उपचारासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेच स्पष्ट केल्यामुळे ‘कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या कथित औषधाला कोणत्या निकषांच्या आधारे मान्यता देण्यात आली, त्याचा तपशील जाहीर करण्याची मागणीही ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे औषध बाजारात दाखल करण्यात आल्याने आरोग्यमंत्र्यानीच उघडपणे देशवासीयांची दिशाभूल केल्याचा आरोप आयएमएने केला आहे.

दरम्यान, औषधाच्या परिणामकारकता तपासण्यासाठी कोणत्या वैद्यकीय चाचण्या केल्या? त्यात कोणत्या रुग्णांचा समावेश होता आणि कोणत्या निकषांवर ‘डीसीजीआय’ने मान्यता दिली याबाबत स्पष्टीकरणाची मागणी ‘आयएमए’ने केली आहे. सोबतच कोणतेही वैज्ञानिक पुरावे नसलेल्या औषधाच्या वापराबाबत आरोग्यमंत्र्यांनी जाहिरात करणे योग्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाउनचा अनुभव सांगताना अजित पवारांनी केले कळकळीचे आवाहन; ‘कृपा करा…’
कचरावेचक दोन भावांच्या टॅलेंटवर फिदा झालेले आनंद महींद्रा त्यांच्यासाठी शोधताहेत शिक्षक
मुंबईत बड्या राजकारणी, अधिकाऱ्यांना पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल; मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश !

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.