“आयएमएच्या लोकांनो वाटीभर पाण्यात बुडून मरा; बाबा रामदेव यांनी करोडो लोकांना बरं केलयं”

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर दिवसरात्र मेहनत घेत आहे. असे असतानाच योग गुरु रामदेव बाबा यांनी डॉक्टरांविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते.

कोरोना रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या वक्तव्यामुळे देशातील डॉक्टर आक्रमक झाले होते. यानंतर आरोग्य मंत्रालयाने बाबा रामदेव यांना चांगलेच झापले होते.

इंडियन मेडिकल असोसिएशन उत्तराखंडने बाबा रामदेव यांना १००० कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली आणि माफी मागण्यास सांगितले आहे. या मुद्द्यावरून आता देशात चांगलाच वाद निर्माण झाला आहे. अशातच भाजप नेत्या आणि विश्व हिंदु परिषदेच्या साध्वी प्राची या बाबा रामदेव यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत.

साध्वी प्राची यांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर करत आयएमएवर सडकून टिका केली आहे. साध्वी प्राची म्हणाल्या, IMA आणि स्वामी रामदेव यांच्यात वाद सुरू आहे. IMAने १९२८ मध्ये एक एनजीओ बनवली होती. भारतात एक मदर तेरेसा नावाची जादुगार होती. जी स्पर्श करून लोकांना बरं करायची. त्यांचा मृत्यू रुग्णालयात  झाला आहे.

पुढे म्हणाल्या, बाबा रामदेव यांनी करोडो लोकांना बरं केलं आहे. आयएमएच्या लोकांनी कान उघडे ठेवून ऐका, लाज वाटू द्या वाटीभर पाण्यात बुडून मरा. भारतात धर्मांतराचा कार्यक्रम सुरू आहे. केंद्र सरकारने यावर कठोर कारवाई केली पाहिजे. असं साध्वी प्राची म्हणाल्या आहेत.

माठातील पाण्यामुळे कोणीही आजारी पडत नाही. फ्रीजमधील पाण्याने पडतं. हे आयुर्वेद सांगतं पण परदेशी कंपन्यांचे दलाल ख्रिश्चन लोक याचा विरोध करतात. रामदेव बाबा यांनी देशासाठी खुप मोठं कार्य केलं आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.

रामदेव बाबा यांनी डॉक्टरांवरील केलेल्या वादग्रस्त वक्त्यानंतर देशभरातून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही बाबा रामदेव यांना फटकारले आहे. उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले  की, बाब रामदेव या बिझनेसमॅनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा.

तिथे डॉक्टर, फ्रंटलाईन वर्करसोबत २४ तास उभे राहून त्यांची परिस्थिती पाहा आणि टरटर करा. हे सर्वात अमानुष आणि घृणास्पद कृत्य आहे. हे कोणाचे टूलकिट आहे? त्यांची इतकी हिंमत होतेच कशी असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-
इतकी बदलली DDLJ मधील छुटकी पुजा रूपारेल, शाहरूख खानची मेव्हणी आता करते ‘हे’ काम
‘बाहुबली’तलं माहिष्मती साम्राज्य काल्पनिक नाही, याठिकाणी आहे खऱ्या अस्तित्वाची नोंद
कोरोना लसीच्या एका डोसने या महिलेला एका रात्रीत बनवले करोडपती, वाचा नेमके काय घडले
सौंदर्यात मोठमोठ्या अभिनेत्रींना टक्कर देणारी भाऊ कदम यांची लाडकी लेक करणार मनोरंजन सृष्टीत प्रवेश?

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.