‘माझी वाट लागली तरी चालेल पण त्याला संपवल्याशिवाय राहणार नाही’; छत्रपती आक्रमक

राजकारणामध्ये एकमेकांवर टिका करणे काही नवीन नाही. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमी संघर्ष पहायला मिळतो. राष्ट्रवादीचे कोरेगाव मतदारसंघाचे आमदार शशिकांत शिंदे आणि साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलाच वाद जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.

जावळी तालुक्यातील कुडाळ गावातील एका कार्यक्रमात शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदे यांना इशारा दिला आहे. शिवेंद्रराजे म्हटले की, माझी वाट लागली तरी चालेल पण त्याचं सर्व संपवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या मागे कोणी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी पण संपेन आणि समोरच्यालाही संपवेन ही आमची भूमिका आहे. मी कुणाला घाबरणारा नाही. मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडूण आलेला माणुस आहे. असं शिवेद्रराजे म्हणाले.

शरद पवारांनी मला जी जबाबदारी दिली ती पार पाडली. मी विरोधात काम केले असं बोललं जातं. दरवेळी माझ्यावर खापर फोडलं जातं ते खपवून घेणार नाही. मी जे बोलतो तेचं करतो, माझी ओळख छत्रपतींचा वारसदार आहे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही ते म्हणाले.

दरम्यान शांत आणि संयमी असलेल्या शिवेंद्रराजेंचा हा आक्रमकपणा पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटलं.

महत्त्वाच्या बातम्या-
ट्रेनला एक किलोमीटरसाठी किती डिझेल लागते? वाचून आश्चर्यचकित व्हाल
“शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही”; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपा नेत्याचं विधान
‘संज्या राऊत झटपट दिल्लीला आंदोलनात फोटो काढायला गेला, मात्र…’
धक्कादायक! व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ’उद्या माझ्या अंत्यसंस्काराला या’ म्हणत शेतकऱ्याची आत्मह.त्या

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.