‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त आहे इलियाना डिक्रुझ; अभिनेत्रीने स्वत:च केला धक्कादायक खुलासा

बॉलिवूडच्या चकचकीत जगात आपण फक्त मनोरंजनांनी भरलेल्या सेलेब्सचे आयुष्य पडद्यावर पाहू शकतो, पण त्यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल क्वचितच कोणी अंदाज लावला असेल. बी-टाऊनमध्ये असे अनेक सेलेब्स आहेत ज्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

त्यामध्ये काही सेलिब्रिटी त्यांच्या समस्यांमधून बाहेर पडले आहेत आणि काही अजूनही संघर्ष करत आहेत. मात्र, इथे आम्ही बोलत आहोत अभिनेत्री इलियाना डिक्रूजबद्दल, जिने अक्षय कुमारसोबत ‘रुस्तम’ मध्ये काम केले होते. इलियाना डिक्रुझने दक्षिण आणि बॉलिवूड दोन्ही इंडस्ट्रींमध्ये काम केले आहे.

इलियानाने तिच्या आरोग्याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले होते की तिला कधीही स्वतःला आरशात बघायला आवडत नव्हते. तिने तिच्या आरोग्याबाबत बोलताना सांगितले की , ती डिसमॉर्फिया या आजाराने ग्रस्त आहे. खूप कमी लोक असतील ज्यांना या आजार आहे.

तज्ज्ञांच्या मते ही एक मानसिक स्थिती आहे. ज्यामध्ये एखाद्याला आपल्या शरीरात दोष आढळतो. याला झुंझ देणारे लोकं स्वत:मध्ये नेहमी कमी पाहतात. यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना त्यांच्या शरीर स्वरुपात किंवा त्यांच्या त्वचेमुळे ते खुप अस्वस्थ होतात. इलियानालाही असेच वाटायचे असे तिने म्हटले आहे.

मी नेहमी कशी दिसते याबद्दल मला नेहमीच काळजी वाटत होती. मी काळजी करत होती की माझे हिप्स खुप रुंद आहे. माझ्या मांड्या वाकड्या आहे. मी पाहिजे तशी सडपातळ नाही. तसेच माझे पोट सपाट नाही, माझे स्तन लहान आहेत, माझे हात सुंदर नाही, माझे ओठ लहान आहे. मला काळजी वाटते मी पुरेशी उंच नाही, हुशार नाही, असे तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ पाच महत्वाच्या कारणांमुळे १८ दिवस झाले तरी आर्यन खानला भेटत नाहीये जामीन
“शाहरुखने भाजपमध्ये प्रवेश केला तरच त्याच्या मुलाला जामीन मिळेल, सोबत देशभक्तीचे प्रमाणपत्रही मिळेल”
रोमान्सचा ओव्हरडोस! स्विमींग पूलमध्येच बिपाशाला घेतले मिठीत; लोकं म्हणाले अजून हनीमून संपला नाही वाटतं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.