सत्ता राखायची असेल तर सेनेचे नगरसेवक परत पाठवा; उद्धव ठाकरेंचा अजित पवारांना थेट इशारा

मुंबई । महाविकास आघाडीतील सध्या तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘आमचे नगरसेवक परत पाठवा, असा संदेश पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना संपर्क साधत निरोप कळवला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे.

सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी पवार यांना कळवला.

या राजकीय खेळीनंतर उद्धव ठाकरे चांगलेच नाराज असल्याचेही सांगितले जात आहे. राज्यात सत्ता ठेवायची असेल, तर शिवसेनेच्या नगरसेवकांना परत पाठवा, असा निरोप त्यांनी अजित पवार यांना दिला आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी समोरही आघाडीत बिघाडी होऊ द्यायची नसेल तर नगरसेवक परत पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ठाकरे यांच्या या थेट निरोपानंतर पवार यांनी यावर विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

आता आघाडीतील मतभेद कोणते रुप घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून आता भाजपकडून देखील सेनेवर टीका होत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.