तुम्हाला कोरोना होऊन गेलाय की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा..

 

कोल्हापूर | राज्यात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मुंबई, पुणे, कोल्हापूर सारखी गर्दीची शहरे कोरोना हॉटस्पॉट बनत चालली आहे.

कोरोनाच्या संकटाने अनेक लोकांच्या मनात संसर्गाची भीती निर्माण झाली आहे, तर काही लोकांचा निव्वळ भीती पोटी मृत्यू होत आहे.

आता मात्र कोरोनाच्या संकटाची कोणालाही भीती बाळगण्याची गरज नाही. कारण आता उपाचार घेणाऱ्या लोकांपेक्षा लाखो लोकांना कोल्हापुरात कोरोना होऊन गेला आहे आणि लोकांना हे कळले सुद्धा नाही.

कोल्हापूरचे डॉक्टर धनंजय लाड यांची क्रोम क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल टुरिझम ही कंपनी जिल्ह्यात १००० लोकांचे अँटी बॉडी चेकअप करणार आहे.

या सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च सुमारे वीस लाख रुपये आहे. एवढा खर्च करणे शक्य नसल्याने लाड यांना सामाजिक संस्था, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींकडून निधी उभारून हा प्रकल्प तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिल्या आहे.

दरम्यान, मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीच्या झोपडपट्टीत लोकांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडीज तयार झाल्याने कोरोनाला आळा बसला होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.