हाय कॉलेस्ट्रॉलपासून हवीय सुटका? हे जालीम सल्ले पाळा आणि कॉलेस्ट्रॉलला बाय बाय बोला

सध्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची हेळसांड करतो त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या जीवनात आधीच मधुमेह, ब्लडप्रेशर, वजनवाढ अशा अनेक समस्या असतात आणि आता यातच भर पडली ती म्हणजे कॉलेस्ट्रॉलची! कॉलेस्ट्रॉलच्या नावाने अनेक जाहिराती केल्या जातात.

भारतात शहरांमध्ये राहणाऱ्या २५ ते ३० टक्के लोकांना हाय कोलेस्टेरॉलच्या समस्या आढळून येतात त्याचबरोबर गावातील १५ ते २० टक्के लोकांना कॉलेस्ट्रॉलच्या समस्या आढळतात. आपल्याला वाटतं की, जर आपले वजन जास्त असेल तर आपल्याला कॉलेस्ट्रॉलची समस्या होऊ शकते पण अगदीच बारीक लोकांमध्येही कॉलेस्ट्रॉल असतो.

कॉलेस्ट्रॉल म्हणजे काय? कॉलेस्ट्रॉल म्हणजे एक प्रकारचा फॅटी चिकट पदार्थ असतो. तो हळू हळू रक्तवाहिन्यांमध्ये जमा होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक समस्या निर्माण होऊ शकतात. यालाच LDL एलडीएल असेही म्हणतात. कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरात जर जास्त असेल त्यामुळे नसा ब्लॉक होऊ शकतात.

हाय कॉलेस्ट्रॉल म्हणजे काय? शरीरात कॉलेस्ट्रॉल सामान्य पातळीपेक्षा जास्त प्रमाणात असते तेव्हा हाय कॉलेस्ट्रॉल होतो. जर हाय कॉलेस्ट्रॉलचा स्तर १०० पेक्षा जास्त असेल, तर विशेषतः ज्या लोकांना रक्तदाब आणि मधुमेहाची समस्या आहे. त्यांना हृदयविकाराच्या समस्या उद्भवू शकतात.

शरीरात कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास ते शरीराला खुप हानिकारक ठरु शकते. कॉलेस्ट्रॉल हे शरीराच्या नसांमधे साठून राहिल्याने रक्ताचे चलनवलन व्हायला अडथळा निर्माण होतो त्यामुळे शरीरातील रक्त हृदयापर्यंत आणि हृदयाचे रक्त शरीरभर जाण्यास अडचण होऊन हार्टअटॅकचा धोका वाढतो. हायपरकोलेस्ट्रोलेमिया हा एक आनुवंशिक आजार असून यात सुद्धा कॉलेस्ट्रॉलच्या उच्च प्रमाणामुळे हार्टअटॅकचा धोका कित्येक पटीने वाढतो.

कॉलेस्ट्रॉलचा धोका टाळण्यासाठी वयस्क व्यक्तींनी ठराविक वेळेनंतर कॉलेस्ट्रॉलची नियमित चाचणी करून घेणे आवश्यक आहे. तरुण व्यक्तींसाठी नियमित व्यायाम आणि कसरत हा कॉलेस्ट्रॉलवरील रामबाण उपाय ठरू शकतो. आहारात तेल तूप यांचे प्रमाण कमी करून कच्छी भाज्या फळे यांचा समावेश केल्यास कॉलेस्ट्रॉलचा धोका कमी करता येतो.

 

महत्वाच्या बातम्या
उपचारासाठी पत्नीला खांद्यावर घेऊन पायी निघाला, पतीच्या खांद्यावर पत्नीचा करुण अंत झाला..
ब्रेकींग! टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा, धोनीसह ‘या’ खेळाडूंची झाली निवड
शार्दुल ठाकूर: पालघरच्या या राजाने ऑस्ट्रेलिया ते इंग्लंडच्या बड्या क्रिकेटर्सच्या नाकीनऊ आणलेत
लाईव्ह शो दरम्यान रॅपरने डोक्याला लावला १७४ कोटींचा हिरा, चाहता भेटायला आला अन् हिरा घेऊन फरार झाला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.