जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? – निलेश राणे

मुंबई। सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. सरनाईक यांच्या पत्राने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मात्र याच पत्रानंतर आता विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करायला सुरवात केली आहे. व याच मुद्यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. “प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागलं. यांच्या सर्व मंत्र्यांना जेलजवळ दिसलं म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत.

जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले तरी त्यांना माफी नाही,” अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य चालवत आहेत. ही नवीन गोष्ट नाही.

आम्ही सुरुवातीपासून तेच सांगतो आहे. राज्य अजित पवार चालवतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे? ज्या ठिकाणी पवारांचे आमदार आहेत. त्याठिकाणी निधी दिला जातो. या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे सरनाईकांच्या या पत्राने नवीन वादाला तोंड फोडलं आहे.

नेमकं पत्रात काय होत पाहुयात…

ईडीची चौकशी मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचे आवाहन केले आहे.

भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच अनेक मुद्दे मांडले आहेत. मात्र यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आणि शिवसेना काय निर्णय घेणार याकडे देखील लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
बाबो! १ कप चहाची किंमत १००० रुपये, काय आहे चहाची खासियत, जाणून घेऊयात
तरुणीने चुकून कंडिशनरच्या जागी लिहिले कंडोम, वडिलांनी पाहिला मेसेज आणि…
विजयने केला सुपस्टार रजनीकांतचा रेकॉर्ड ब्रेक? एका चित्रपटासाठी घेतले सर्वाधिक मानधन 
पुण्यातला तरुण शेवग्याच्या पानांपासून चिक्की, चॉकलेट, विकून कमवतोय लाखो रुपये, जाणून घ्या..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.