महाराष्ट्रातील राजकीय वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. यानंतर शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना निलंबनाच्या संदर्भात नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. या नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे(Eknath Shinde) गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.(if-we-win-in-the-supreme-court-but-we-lose-shinde-group-mlas-announced-next-plan)
एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात १६ बंडखोर आमदारांना निलंबनाच्या नोटिसीविरोधात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज या याचिकेची सुनावणी पार पडणार आहे. यादरम्यान शिंदे गटातून मोठी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
“सुप्रीम कोर्टात आम्हीच जिंकू, पण हरलो तर गट स्थापन करावा लागेल. आज पत्रक काढून भूमिका जाहीर करू”, असे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. यावेळी बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी तीन महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. पहिला मुद्दा बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेसंदर्भात मांडला आहे.
१६ बंडखोर आमदारांना निलंबनाच्या नोटिसीला शिंदे गटाने विरोध दर्शवला आहे. या नोटिसीच्या संदर्भातील याचिकेची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेच्या संदर्भात बोलताना बंडखोर आमदार दीपक केसरकर म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयात जिंकणार तर आम्हीच पण हरलो तर गट स्थापन करावा लागेल.”
आमदार दीपक केसरकर यांनी दुसरा मुद्दा पक्षाविरोधात केलेल्या बंडखोरीच्या संदर्भात मांडला आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीमागचे कारण आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. काही दिवसांमध्ये महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये संघर्ष नको म्हणून बंडखोरी केल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.
तिसरा मुद्दा आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटाच्या भूमिकेसंदर्भात मांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाबद्दल वेगवेगळ्या चर्चा समोर येत आहेत. या चर्चांवर अद्याप शिंदे गटाकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. आज शिंदे गटाकडून एक पत्रक जाहीर करण्यात येणार आहे. या पत्रकामध्ये शिंदे गटाची भूमिका जाहीर केली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
शिवसैनिक आणि बंडखोर आमदाराच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मोठी बातमी! बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला; ठाकरे सरकार कोसळणार
माझी मान कापली तरी मी गुवाहटीत जाणार नाही, ईडीचं समन्स आल्यानंतरही राऊत ठाम





