“अजितदादा जरा सांभाळून बोला, मी फाटक्या तोंडाचा आहे, बोलायला लागलो तर महागात पडेल”

कोल्हापुर | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चांगलच शाब्दिक वाद रंगू लागला आहे. चंद्रकांत पाटील यांनी जनता झोपेत असताना ठाकरे सरकार पडेल असं विधान केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनीही जोरदार प्रतिउत्तर दिले होते.

चंद्रकांत पाटील जागे असताना बोलले होते की झोपेत बोलले होते. असा टोला अजित पवारांनी लगावला होता. यावर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुर येथे बोलताना पुन्हा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी जरा सांभाळून बोलावे. आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. बोलायला लागलो तर महागात पडेल.

झोपेत असताना सरकार कसं आणायचं हे अजित पवारांना चांगलचं ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत सरकार स्थापन करून मोकळे झाला होतात. मात्र अजित पवार यांना आपण काल काय केलं होतंं. ही गोष्ट लक्षात राहत नाही. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे म्हणाले, अजित पवार यांना तलवारीचा धाक दाखवून कोणी शपथविधीसाठी नेले नव्हते. त्यामुळे आपण ज्या भाजपसोबत तीन दिवसांचे सरकार स्थापन केले होते आणि ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो, त्यांच्याविषयी काय बोलतोय, याचे भान अजित पवार यांनी बाळगावे.

तुम्हाला राष्ट्रवादीचे २८ आमदार तुमच्यासोबत ठेवता आले नाहीत. ते शरद पवारांकडे पुन्हा पळून गेले. हा अजित पवार यांचा दोष आहे. अजित पवार यांना सगळीकडे राहायचे असते. ज्याचं सरकार असेल तिथे मी जाणार, हे एकच तत्व.. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-
इंडियन आयडॉलमध्ये जुळली आणखी एक प्रेमकथा? सायली कांबळेने ‘या’ स्पर्धकावर प्रेम केले व्यक्त
RBI आणतेय १०० रुपयांची नवी नोट, ना फाटणार ना भिजणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये
शिवशक्ती भीमशक्तीची जोडी जमली; मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंना प्रकाश आंबेडकरांची साथ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.