‘जर विठ्ठल सगळे करणार असेल तर तुम्ही कशाला पाहिजे?, सत्तेतून बाजूला व्हा’

 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते काल (बुधवार) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात महापूजा पार पडली आहे.

महापूजेनंतर उद्धव ठाकरेंनी पांडुरंगाला, बळीराजाला सुखी कर, कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे घातले आहे.

या साकड्यावरून आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

जर सगळे काही विठ्ठल करणार असेल, तर तुमची गरज काय? विठ्ठलालाच सगळे करायचे असेल तर उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाजूला व्हावे, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे.

तसेच या सरकारने सगळे काही देवावर सोडून दिले आहे. हे सरकार निराशावादी सरकार असल्याने महाविकास आघाडीला सत्तेत राहण्याचा कोणताच अधिकार नाही, असेही यावेळी मेटे म्हणाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.