मैत्री असावी तर अशी! इवल्याशा कुत्र्याची घोड्यासोबत जमली गट्टी; व्हिडीओ होतोय भन्नाट व्हायरल

मुंबई। सध्या सोशल मीडियावर दिवसाला हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडिओ हे मजेशीर असतात, काही थरारक असतात तर काही सर्वाना हैराण करणारे असतात. मात्र काही व्हिडिओ हे नेटकऱ्यांचे लक्ष लगेच आकर्षित करून घेतात.

त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे, व आता हा व्हिडिओ भन्नाट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर अनेक प्राण्यांच्या संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात आणि लोक त्या व्हिडिओला आवडीने बघत सुद्धा असतात. अशातच आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल ज्यात सर्वांचा लाडका प्राणी कुत्रा किती हुशार आहे हे समजत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा ट्विटरवर ViralHog नावाच्या एका यूजरनं शेअर केला आहे. यासोबतच या व्हिडिओ कॅप्शनही देण्यात आलं आहे. यात लिहिलं आहे, की काळजी करू नको, मी तुला गाईड करेल. या तर पाहुयात या व्हिडिओत नेमकं काय आहे.

खरतर बरेचसे लोक कुत्र्यावर प्रचंड प्रेम करत असतात. बहुतेक लोक कुत्र्याला विश्वासू प्राणी असल्यामुळे पाळतात त्याच्याशी मैत्री करतात. कुत्रा देखील आपल्या मालकावर प्रचंड प्रेम करत असल्याचे आपण पाहिले आहे.

आपण आतापर्यंत अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात ते भांडताना दिसतात. तर, कधी माणसांसोबतची त्यांची घनिष्ट मैत्री पाहायला मिळते. मात्र, सध्या जो व्हिडिओ समोर आला आहे, त्यात एक छोटासा कुत्रा एका घोड्याला कंट्रोल करताना दिसतो. हा व्हिडिओ पाहण्यासारखा आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, कुत्रा घोड्याचा लगाम आपल्या दातांने पकडून पुढे चालत आहे आणि विशेष बाब म्हणजे घोडाही या कुत्र्याच्या मागे मागे चालत आहे. कुत्रा आणि घोड्याची ही मैत्री लोकांचं मन जिंकत आहे. जर घोडा रागावला किंवा खवळला तर त्याला कंट्रोल करणं खूप कठीण असत.

मात्र हा इवलासा कुत्रा घोड्याला लगाम घालताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच 28 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तसेच या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका यूजरनं म्हटलं, की कदाचित आपल्या याच गुणांमुळे हा प्राणी माणसांचा आवडता आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, की कुत्रा आणि घोड्याची ही मैत्री खरंच पाहण्यासारखी आहे असं लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
रिलेशनशिपमुळे ट्रोल होताच ‘तारक मेहता…’फेम मुनमुन दत्ता भडकली; म्हणाली भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय… 
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत.. 
कंगना रनौतने ‘कपिल शर्मा शो’मध्ये सांगितल्या तिच्या लग्न करण्यासाठीच्या अटी; वाचून हैराण व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.