‘…जर झोपलेली जनता जागी झाली, तर मोदी सरकारही कोसळेल’- अण्णा हजारे

राळेगणसिद्धी। देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. मात्र त्यानंतरही देशाची अवस्था ठीक नाही. स्वातंत्र्यापूर्वी देशाला लुटणारे बाहेरील होते. आज देशाला लुटणारे देशातीलच आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात चारित्र्यशील व सामाजिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय संघटन होणे ही काळाची गरज आहे.

देशातील जनता जागी झाली, तर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकारही पडू शकते, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या राष्ट्रीय पातळीवरील एकदिवसीय शिबीर राळेगणसिद्धी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

या शिबिरात बोलताना हजारे यांनी देशाच्या सद्य:स्थितीवर हे परखड भाष्य केले. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात अण्णा हजारे यांनी राज्यातील लोकायुक्त कायदा सक्षम करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. अन्यथा जानेवारीपासून आंदोलनचा इशारा देताना एक तर कायदा होईल, किंवा राज्यातील ठाकरे सरकार पडेल, असा निर्वाणीचा इशारा दिला.

ते म्हणाले, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, यामागे सर्व राजकीय पक्ष पळत आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षापासून देशाला उज्ज्वल भविष्य नाही. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेऊन अनेक राजकीय पक्ष काम करीत आहेत. त्यांच्यावर जनतेने दबाव निर्माण करावा. झोपलेली जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते, असेही ते म्हणाले.

याशिवाय देशाला वाचविण्यासाठी दुसरा मार्ग नाही. ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दोनदा, २०१८ आणि १९ मध्ये आंदोलने केली. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले. शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळावा, अशी आपली आग्रही भूमिका आहे.

तसेच शेतकरी आंदोलन आणि इतर बाबतीत माझ्यावर टीका होते, मात्र मी त्याकडे लक्ष देत नाही. समाज आणि देशहितासाठी शक्य ते प्रामाणिकपणे करणे हे माझे काम आहे आणि ते मी गेली ४६ वर्षे मंदिरात राहून करीत आहे’ असे अण्णा हजारे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
ब्रेकींग! मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले,आरक्षण नाही म्हणून…
भारतीय क्रिकेट संघाचा कोच कोण होणार? बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले ‘हे’ नाव..
मराठमोळी अभिनेत्री कविता मेढेकर यांनी शेअर केला मुलीसोबतचा फोटो, फोटो बघून घायाळ व्हाल..
नीरज चोप्राने ज्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली 2 सुवर्ण जिंकली त्यांची हकालपट्टी का करण्यात आली?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.