“पांढरे केस का लपवत नाहीस?”; वडिलांच्या प्रश्नावर समीरा रेड्डीने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाली…

मुंबई। बॉलीवूड मधील अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री समीरा रेड्डी ही सध्या अभिनयापासून दूर आहे. अभिनयापासून दूर असली तरी समीरा वैवाहिक जीवनात, बऱ्याच काळापासून लोकांना शरीराच्या सकारात्मकतेबद्दल (बॉडी पॉझिटिव्हिटी) जागरूक करत असते.

समीरा रेड्डीने आता स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यात तिचे पांढरे केस दिसत आहेत. समीराने हे फोटो शेअर करत तिच्या वडिलांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तिचे वडील काळजीत आहेत की ती आपले पांढरे केस का लपवत नाही? म्हणूनच समीराने फोटो शेअर करत तिच्या वडिलांना भन्नाट उत्तर दिले आहे.

सोशल मीडियावर तिचे पांढरे केसांचे फोटो शेअर करताना समीरा म्हणाली, ‘माझ्या वडिलांनी मला विचारले की मी माझे पांढरे केस का लपवत नाही? त्यावर तिने उत्तर दिलं की, काय फरक पडतो, यामुळे मला वयस्कर किंवा कमी आकर्षक किंवा कमी सुंदर समजलं जाईल का?, मी त्यांना म्हणाले की आता या गोष्टीचा मला त्रास होत नाही जसा यापूर्वी व्हायचा. स्वतंत्र असण्याचा हा एक आनंद आहे.”

समीराने पुढे लिहिले, ‘मी दर 2 आठवड्यांनी माझे केस रंगवायचो जेणेकरून कोणीही एकच पांढरे केस पाहू शकणार नाही. आज केस रंगवायचे की नाही याचा निर्णय मी स्वत: घेते. मला माहितेय मी एकटी नाही. जेव्हा जुन्या विचारांच्या पद्धतीती मोडल्या जातात तेव्हाच बदल घडतो. ”

आपण जसे आहोत तसेच राहू दिलं तर हे बदल घडणं शक्य आहेत. जेव्हा आपल्याला एखद्या रंगाच्या किंवा मास्कच्या मागे लपण्याची गरज भासणार नाही तेव्हाच आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक दिवस आपल्याला पुढे जाण्याची शिकवण देतो यातूनच शांती मिळते.” असं समीरा म्हणाली.

तसचं वडिलांची चिंता ती समजू शकते मात्र आता त्यांना उत्तर मिळालंय असंही ती म्हणाली. समीरा रेड्डीने महाराष्ट्रीयन परंपरेनुसार 2014 मध्ये बिझनेसमन अक्षय वर्दे सोबत लग्न केले. समीराचा मुलगा हंस वर्देचा जन्म 2015 मध्ये झाला होता आणि त्यांची मुलगी नायराचा जन्म 2019 मध्ये झाला होता. समीरा शेवटची 2013 मध्ये कन्नड चित्रपट ‘वरधन्यका’ मध्ये दिसली होती.
महत्वाच्या बातम्या
मुस्लिम कुटुंबाच्या घरी दरवर्षी येतो बाप्पा! बाप्पामुळेच पुत्ररत्न लाभल्याचा रेहमानचा दावा 
ज्यांच्या चालण्याने सुद्धा जमीन हादरायची ते हत्ती परत येणार, १० हजार वर्षांपूर्वी या हत्तींची प्रजाती झाली होती विलुप्त
मुंबईच्या ‘या’ गणपतीच्या अंगावर तब्बल २ कोटींचे सुवर्ण अलंकार, राज्यभरात होतेय चर्चा
ते ८० हजार कोटी कोणाचे? भली मोठी रक्कम वारसदार नसल्याने आहे तशीच पडून…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.