”पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते?’ अमित शहांचा सवाल

नवी दिल्ली। देशात मंगळवारी हिंदी दिन साजरा करण्यात आला. हिंदी दिनानिमित्त अनेकांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी देखील हिंदी दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी एका मेळाव्या दरम्यान जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात, तर आम्हाला कशाबद्दल लाज वाटते? ते दिवस गेले जेव्हा हिंदीत बोलणे हा चिंतेचा विषय होता”, अस गृहमंत्री अमित शाह म्हणाले आहेत.

हिंदी दिनानिमित्त एक मेळावा भरवण्यात आला होता या मेळाव्याला संबोधित करताना भारताला भाषांच्या बाबतीतही आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. “आत्मनिर्भर असणे म्हणजे केवळ देशामध्ये उत्पादन करणे नव्हे, भाषांच्या बाबतीतही आपण ‘आत्मनिर्भर’ असणे आवश्यक आहे.

पुढे ते म्हणाले, जर पंतप्रधान आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदी बोलू शकतात, तर आम्हाला कशाबद्दल लाज वाटते? ते दिवस गेले जेव्हा हिंदीत बोलणे हा चिंतेचा विषय होता”, अस अमित शाह म्हणाले. या संदर्भात अमित शाह यांनी एक ट्विटदेखील केलं आहे.

अमित शाह पुढे म्हणाले की, “भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषेच्या समन्वयात आहे. ”हिंदी दिवसाच्या निमित्ताने, मी सर्व देशवासियांना विनंती करतो की, मूलभूत कार्यांमध्ये त्यांच्या मातृभाषेसह हिंदी ही अधिकृत भाषांपैकी एक असलेल्या हिंदीचा उत्तरोत्तर वापर करण्याची प्रतिज्ञा घ्या. भारताची प्रगती मातृभाषा आणि राजभाषा यांच्या समन्वयात आहे. आपणा सर्वांना हिंदी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, असं शाह यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सर्व भारतवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपणा सर्वांना हिंदी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदीला सक्षम आणि सक्षम भाषा बनवण्यासाठी विविध क्षेत्रांतील लोकांनी उल्लेखनीय भूमिका बजावली आहे. तुमच्या सर्व प्रयत्नांचा हा परिणाम आहे की हिंदी सतत जागतिक व्यासपीठावर आपली मजबूत ओळख निर्माण करत आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
विराट कोहली देणार कर्णधारपदाचा राजीनामा? बीसीसीआयकडून मोठा खुलासा.. 
नाद खुळा! ३ कोटींचं कर्ज फक्त १७ महिन्यात फेडलं; महिलेने सांगितली पैसे बचतीची भन्नाट आयडिया
“तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवता तेवढा इथे तुमचा जास्त आदर, म्हणून आजही इंडस्ट्रीमध्ये तीन खान टॉपला”
‘हा काय मुर्खपणा सुरू आहे…’ भारतातील महिला अत्याचारांवर अभिनेत्रींचा उद्विग्न सवाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.